भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. यावेळी दोन्ही संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. (India vs England Test Series) तत्पूर्वी भारत अ विरुद्ध होणाऱ्या 2 सामन्यांच्या प्रथम श्रेणी मालिकेसाठी इंग्लंड लायन्स संघाची घोषणा करण्यात आली आहे. युवा खेळाडूंव्यतिरिक्त अनेक वरिष्ठ खेळाडूंना देखील संधी मिळाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) भारत अ विरुद्ध होणाऱ्या 2 सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड लायन्स संघात 14 खेळाडूंना संधी दिली आहे.
इंग्लंड लायन्स संघात क्रिस वोक्सलाही (Chris Woakes) भारत अ विरुद्ध संधी मिळाली आहे. दुखापतीमुळे तो बराच काळ इंग्लंड संघापासून दूर होता. सोमरसेटचा जेम्स रीव्ह पहिल्यांदाच भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स संघाचे नेतृत्व करेल. इंग्लंड लायन्स आणि इंडिया अ यांच्यातील पहिला सामना (30 मे) पासून कॅंटरबरीच्या सेंट लॉरेन्स स्पिटफायर मैदानावर खेळला जाईल. तर दुसरा सामना शुक्रवारी (6 जून) पासून नॉर्थम्प्टनमधील काउंटी मैदानावर खेळला जाईल.
यावेळी, इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) येथील पुरुष क्रिकेटचे परफॉर्मन्स डायरेक्टर एड बार्नी म्हणाले की, हा दौरा आमच्या खेळाडूंसाठी भारत अ सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळण्याची एक उत्तम संधी आहे. हे सर्व खेळाडू खूप प्रतिभावान आणि उत्साहाने भरलेले आहेत. या मालिकेमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. तसेच, इंग्लंड संघाच्या भविष्यासाठी चांगली तयारी आणि योजना आखण्यास मदत होईल.
भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स संघ- जेम्स रीव्ह (कर्णधार), रॉकी फ्लिंटॉफ, एडी जॅक, फारहान अहमद, इमिलियो गे, बेन मॅककिनी रेहान अहमद, टॉम हायन्स, डॅन मोजली, सॉनी बेकर, जॉर्ज हिल, अजीत सिंग डेल, जॉर्डन कॉक्स, जोश हुल, क्रिस वोक्स
Woakesy's back ❤️
— England Cricket (@englandcricket) May 21, 2025
He's been named in a strong England Lions squad to face India A in two four-day games, starting 30 May.
Click below to see the full squad ????




टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा