---Advertisement---

ऍशेस मालिका तोंडावर असताना इंग्लंडचा ‘हा’ २८ वर्षीय गोलंदाज कसोटीतून निवृत्ती घेण्याच्या विचारात

On: रविवार, नोव्हेंबर 21, 2021 12:10 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये येत्या महिन्यात ऍशेस मालिका रंगणार आहे. या मालिकेची सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली स्टोन दुखापतीमुळे कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याच्या विचारात आहे. स्टोन सध्या अवघ्या २८ वर्षांचा असून त्याची ऍशेस मालिकेसाठी इंग्लंडच्या कसोटी संघात निवड झालेली नाही. तरीही त्याच्यासारख्या प्रतिभाशाली गोलंदाजाने कसोटीतून इतक्या लवकर निवृत्ती घेणे इंग्लंडसाठी झटक्याहून कमी नसेल.

स्टोनने वर्ष २०१९ मध्ये आयर्लंडविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. परंतु त्याला आतापर्यंत कसोटी कारकिर्दीत केवळ ३ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १० विकेट्सही चटकावल्या आहेत. जूनमध्ये मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात स्टोनला पाठीची दुखापत झाली होती. स्कॅन रिपोर्टमध्ये त्याचा थर्ड स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याचे आढळले. त्यामुळे त्याच्या पाठीच्या खालील भागामध्ये वेदना होण्यास सुरुवात झाली होती आणि याच कारणामुळे तो पूर्ण हंगामभर क्रिकेटपासून दूर राहिला होता.

यानंतर स्टोनने दुखापतीतून सावरत स्वत:ला कसोटी क्रिकेटसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण क्रिकेटच्या या स्वरुपात पुनरागमन करू शकू, याबाबत तो खात्रीशीर नसल्याने तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे.

बीबीसीच्या ऍशेस पॉडकास्टवर बोलताना स्टोन म्हणाला की, “मी स्वत:लाच पुनरागमनासाठी सर्वश्रेष्ठ संधी देऊन पाहिली. मी कसोटी क्रिकेटमध्ये परतण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. परंतु अथक प्रयत्नांनतरही जर मी या स्वरुपात खेळण्यास पात्र बनू शकत नसेल; तर मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणेच शहाणपणाचा निर्णय ठरले.”

“प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, मी माझ्या निवृत्तीविषयी खूप गांभीर्याने विचार केला की, मी अजून प्रयत्न करू इच्छितो आहे का? आणि पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्यास तयार आहे का? यावर मला वाटले की, मी मैदानाबाहेर जे करू शकत होतो मी ते सर्वकाही केले. डायट केले, स्वत:ला पूर्वीपेक्षा अधिक तंदुरुस्त आणि मजबूत बनवले,” असेही त्याने म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२१ चा ‘हा’ भारतीय ‘स्पीडस्टार’ लवकरच मिळवणार नॅशनल कॅप, पाकिस्तानी दिग्गजाचा दावा

जहीर खानचे महत्वपूर्ण विधान; म्हणाला, “व्यंकटेशला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणे म्हणजे…”

केवळ अशक्य! ‘या’ तीन भारतीय खेळाडूंसाठी कायमचे बंद झाले आहेत टीम इंडियाचे दरवाजे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---