वेस्ट इंडिजचा (West Indies) सध्या इंग्लंड दौरा सुरु आहे. त्यामध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यामध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत इंग्लंडनं सलग 2 कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर केली आहे. तिसरा कसोटी सामना (26 जुलै) रोजी एजबेस्टन या मैदानावर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी इंग्लंडचा खेळाडू ओली पोप (Ollie Pope) म्हणाला, आमचा संघ कसोटीमध्ये एका दिवसात 600 धावा करु शकतो.
कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) एका दिवसात सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड इंग्लंडच्या नावावर आहे. 1936मध्ये भारताविरुद्ध मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडनं 6 विकेट्स गमावून 588 धावा ठोकल्या होत्या. डिसेंबर 2022मध्ये रावलपिंडी येथे पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं 506 धावा केल्या होत्या.
बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नेतृत्वाखाली खेळत असलेला इंग्लंड संघ हा 588 धावांचा रेकाॅर्ड मोडीत काढू शकतो, असं इंग्लंड खेळाडू ओली पोपला (Ollie Pope) वाटत आहे.
ओली पोप (Ollie Pope) ‘बीबीसी स्पोर्ट’शी बोलताना म्हणाला की, “कधी-कधी आम्ही एका दिवसात 280 किंवा 300 धावा करु शकतो कारण आम्हाला परिस्थिती चांगल्या प्रकारे समजते. पण भविष्यात असा दिवस येईल जेव्हा आम्ही 500 ते 600 धावा करु. तो एक चांगला रेकाॅर्ड असेल.”
ओली पोप (Ollie Pope) हा इंग्लंडचा उत्कृष्ट कसोटी खेळाडू आहे. शेवटच्या कसोटी सामन्यात त्यानं धमाकेदार शतकी खेळी खेळली. पोप हा 26 वर्षाचा आहे. त्यानं इंग्लंडसाठी 45 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 80 डावांमध्ये 2,680 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 35.73 राहिली आहे. तर सर्वोच्च धावसंख्या 205 राहिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं आतापर्यंत 13 अर्धशतक आणि 6 शतकं झळकावली आहेत. त्यासोबतच त्यानं एक दुहेरी शतक देखील झळकावलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
खेळाच्या विश्वातील सुपरस्टार! या क्रिकेटपटूच्या पत्नीनं ऑलिम्पिकमध्ये जिंकली आहेत 2 पदकं
श्रीलंका मालिकेपूर्वी संघाला धक्का, स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर
“आपल्या सर्वांना एक दिवस जायचं आहे, पण…”; कर्करोगाशी लढा देत असलेल्या माजी क्रिकेटपटूला कपिल देवचा आधार