---Advertisement---

गाबा पिचला इंग्लंडच्या दिग्गजाचे समर्थन! भारताच्या खेळाडूने एक ट्वीट करत केली बोलती बंद

Dinesh Karthik and Wasim Jaffer
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUSvSA) यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यावरून क्रिकेटवर्तुळात नव्या वादाला सुरूवात झाली. पाच दिवसांचा हा सामना केवळ दोनच दिवसात कसा काय संपतो? असे प्रश्न विचारले गेले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हा सामना शनिवारी (17 डिसेंबर) सुरू झाला होता आणि रविवारी (18 डिसेंबर) तो संपला.ब्रिस्बेनच्या गाबा खेळपट्टीवर हा सामना खेळला गेला. त्या खेळपट्टीला आयसीसीने सरासरीपेक्षा खराब म्हटले असून या वादात आता भारत-इंग्लंडच्या दिग्गजांनी उडी घेतली आहे.

गाबा खेळपट्टीला समर्थन दर्शवण्यासाठी इंग्लंडचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू सायमन ह्यूज यांनी बीसीसीआयला टॅग करत ट्वीट केले. त्यामध्ये त्यांनी गाबाच्या खेळपट्टीचा फोटो जोडत लिहिले, ‘सर्व बीसीसीआय क्रिकेट चाहत्यांना म्हणू इच्छितो की, गाबाच्या खेळपट्टीवर बॅट आणि बॉल यांच्यात योग्य सामना झाला. या फोटोमध्ये तुम्ही खेळपट्टीला पडलेल्या भेगा पाहू शकता. या खेळपट्टीमुळे एकाच संघाला मदत झाली नाही.’

सायमन याच्या ट्वीटला भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) याने उत्तर दिले आहे. त्याने म्हटले, ‘अहमदाबादच्या खेळपट्टीने एकाच संघाचे समर्थन केले होते कारण त्या टर्निंग पीचवर इंग्लंडने चार वेगवान गोलंदाज खेळवले होते.’

गाबा खेळपट्टीला आयसीसीने एक डिमेरिट पॉइंटही दिला आहे. यावर आयसीसीने निर्णय दिला आहे. आयसीसीचे मॅच रेफरीच्या एलिट पॅनलचे सदस्य रिची रिचर्डसन यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिले, ‘ब्रिस्बेन येथील खेळपट्टीवर बॅट आणि बॉल यांच्या दरम्यान स्पर्धा नव्हती. ही खेळपट्टी गोलंदाजांना अधिक मदत करताना दिसली‌. क्रिकेटच्या वाढीसाठी ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे या खेळपट्टीला सरासरीपेक्षा खराब म्हटले जातेय.’

ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात चाहत्यांना मनोरंजक सामन्याची अपेक्षा होती. मात्र, सामना दोन दिवस देखील खेळला गेला नाही. साडेपाच सत्रांमध्येच सामन्याचा निकाल लागला. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन वेळा फलंदाजी केली व 114 षटकात तब्बल 34 फलंदाज बाद झाले. यातील 34 पैकी 26 फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नव्हता. England player Simon Hughes tag BCCI on Tweet About Gabba Pitch Controversy Wasim Jaffer Answer

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---