---Advertisement---

INDvsENG: टीम इंडिया जरा जपूनच, ‘हे’ इंग्लिश खेळाडू एकहाती पलटू शकतात सामना 

On: शुक्रवार, मार्च 12, 2021 10:47 AM
---Advertisement---

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे शुक्रवारपासून (१२ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी२० मालिका चालू होणार आहे. यजमान संघातील खेळाडूंचा जबरदस्त फॉर्म आणि मागील आकडेवारी पाहता भारताचे पारडे अधिक जड असल्याचे म्हटले जात आहे. परंतु पाहुण्या इंग्लंड संघातही एकाहून एक जबरदस्त खेळाडू उपलब्ध आहेत, जे एकहाती सामना जिंकण्याची क्षमता राखतात.

इंग्लंडच्या टी२० संघात अष्टपैलू क्रिकेटपटूंची भरमार आहे. बेन स्टोक्स, सॅम करन, मोईन अली असे फलंदाजी आणि गोलंदाजीत उत्कृष्ट असलेले खेळाडू त्यांच्याकडे आहेत. याबरोबरच जोफ्रा आर्चर, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन यांसारखे वेगवान गोलंदाज इंग्लंडकडे आहेत. तर अहमदाबादच्या फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर दमदार गोलंदाजी करण्यासाठी फिरकीपटू आदिल राशिदचा पर्याय आहे.

भारत आणि इंग्लंड या उभय संघात धाकड फलंदाज उपलब्ध आहेत. रोहित शर्मा, रिषभ पंत, हार्दिक पंड्या चौकार-षटकारांचा पाऊस पाडत इंग्लंडच्या नाकी नऊ आणू शकतात. मात्र इंग्लंडकडेही कर्णधार ऑयन मॉर्गनसारखा आक्रमक फलंदाज उपलब्ध आहे. तसेच जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, डेविड मलान आणि जेसन रॉय जबरदस्त फटकेबाजी करू शकतात. त्यांच्यामध्ये हातून निसटता सामना आपल्या बाजूने करण्याची क्षमता आहे.

त्यामुळे भारत-इंग्लंड यांच्यातील टी२० मालिका अतिशय रोमांचक होणार, हे निश्चित आहे.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –

इंग्लंड संघ – जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मालन, जॉनी बेअरस्टो, ओएन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, सॅम बिलिंग्ज, रीस टोपली, मार्क वूड, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन

भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, अक्षर पटेल, शिखर धवन, दीपक चाहर, श्रेयस अय्यर, राहुल तेवतिया, टी नटराजन, इशान किशन, राहुल चाहर

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाचा धाक! टी२० मालिकेपुर्वी इंग्लंडच्या कॅप्टनचे मोठे भाष्य, म्हणाला, “भारताला भारतात पराभूत…”

T20 Series: हे आहेत ३ गोलंदाज, जे दुखापतग्रस्त टी नटराजनची घेऊ शकतात जागा

‘थाला’चा मोठा डावपेच, आयपीएल २०२१ पुर्वी ‘नव्या मलिंगा’ला संधी; गोलंदाजी पाहून चक्रावून जाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---