आजपासून(८ जूलै) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कसोटी मालिका सुरु होत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटानंतर ही पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका आहे. ही मालिका कोरोना योद्धांसाठी समर्पित करण्यात आली आहे. त्याचमुळे या मालिकेचे नाव ‘रेज द बॅट’ असे ठेवण्यात आले आहे.
इंग्लंज संघाकडून या कसोटी मालिकेतून कोरोना व्हायरस विरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून साऊथँप्टन येथे सुरु होणाऱ्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांच्या ट्रेनिंग जर्सीवर या कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या लोकांचे नाव लिहिले आहे.
ही नावे स्थानिक क्रिकेट क्लबद्वारे नामांकित केलेल्या मुख्य कर्मचाऱ्यांची आहेत. ज्यात शिक्षक, डॉक्टर्स, नर्स, समाजसेवक अशा अनेकांचा समावेश आहे. यांच्या सर्व कथा ईसीबीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जातील.
याबद्दल इंग्लंड कसोटी संघाचा नियमित कर्णधार जो रुटने म्हटले आहे की ‘सर्वात कठीण परिस्थितीत आपल्या देशासाठी काम केलेल्या या शूर कर्मचाऱ्यांचा सन्मान आम्हाला करायचा होता. त्यामुळे आम्ही या मालिकेचा उपयोग करुन त्यांचा सन्मान करु. आम्ही त्यांची नावे अभिमानाने परिधान करु.’
तसेच इंग्लंडच्या खेळाडूंनी कर्मचाऱ्यांची नावे असलेली ट्रेनिंग जर्सी घातल्याचे फोटो आयसीसीनेही शेअर केले आहेत.
Key workers are being honoured this morning, with their names featured on England's training shirts 👏 pic.twitter.com/du2NVmp2Y3
— ICC (@ICC) July 8, 2020
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला कसोटी सामना द रोज बॉल स्टेडियम, साऊथँप्टन येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० सुरु होणार आहे. या सामन्यासाठी बेन स्टोक्स इंग्लंडचा प्रभारी कर्णधार आहे. या सामन्यात रुट खेळणार नाही.
ट्रेंडिंग घडामोडी –
संपूर्ण वेळापत्रक: पाकिस्तानपूर्वी इंग्लंड भिडणार ‘या’ संघाशी
“येत्या १० वर्षात धोनी होणार सीएसकेचा बॉस”
धोनीने झटक्यात निर्णय घेत म्हणाला, उरलेल्या ओव्हरमध्ये दादा करेल भारतीय संघाचे नेतृत्व