सध्या इंग्लंडमध्ये यजमान इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान कसोटी मालिका खेळली जात आहे. लॉर्ड्स येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला डावाने पराभूत करण्याची किमया केली होती. बेन स्टोक्स कर्णधार झाल्यापासून इंग्लंडचा हा पहिलाच पराभव होता. आता मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून, इंग्लंडने या दुसऱ्या सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन एक दिवस आधीच जाहीर केली आहे.
ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंडला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते. दक्षिण आफ्रिकेने त्यांना अवघ्या अडीच दिवसात नेस्तनाबूत करत एक डाव आणि बारा धावांनी पराभूत केले. कर्णधार स्टोक्स व प्रशिक्षक मॅकलम यांच्या कारकिर्दीतील हा पहिला पराभव ठरला.
Our XI for the 2nd Test at @EmiratesOT 🏏
🏴 #ENGvSA 🇿🇦 @lv_cricket pic.twitter.com/FUHo91Jffj
— England Cricket (@englandcricket) August 24, 2022
उभय संघातील दुसरी कसोटी २५ ऑगस्टपासून मँचेस्टर येथे खेळली जाईल. त्या कसोटीसाठी इंग्लंडने एक दिवस आधीच आपला संघ जाहीर केला. पहिल्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करत युवा मॅट पॉट्सच्या जागी ओली रॉबीन्सन याला संधी मिळाली आहे. रॉबीन्सन हा सातत्याने दुखापदग्रस्त होता. तो जवळपास सात महिन्यानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन करतोय. सातत्याने खराब कामगिरी करत असलेल्या सलामीवीर झॅक क्राऊली याच्यावर संघ व्यवस्थापनाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. तर अनुभवीं जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड ही जोडी देखील आपल्याला दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा दिसेल.
मँचेस्टर कसोटीसाठी इंग्लंड संघ-
जॅक लीस, झॅक क्राऊली, जो रूट, ओली पोप, बेन स्टोक्स (कर्णधार), ओली पोप, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (यष्टीरक्षक), ओली रॉबीन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लिच व जेम्स अँडरसन.
महत्त्वाच्या बातम्या-
आता चीनलाही खेळायचय ‘जबरा’ क्रिकेट! भारताकडेच मागितली ‘या’ गोष्टीची मदत
रोज मारतोयं १५० षटकार! भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या फलंदाजाचा भयानक प्लान
बांगलादेशच घोडं आशिया कप आधीच अडल! एका पाठोपाठ तीन मॅचविनर स्पर्धेतून बाहेर