वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (11 नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान असा सामना खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डनवर खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या सर्वच फलंदाजांनी शानदार फटकेबाजी करत हा निर्णय सार्थ ठरवला. इंग्लंडसाठी सलामीवीर जॉनी बेअरस्टो, जो रूट व बेन स्टोक्स यांनी शानदार अर्धशतके ठोकत संघाला 337 पर्यंत मजल मारून दिली.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. डेव्हिड मलान व जॉनी बेअरस्टो यांनी संयमी सुरुवात केल्यानंतर संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. मलान बाद झाल्यानंतर बेअरस्टोने अर्धशतक पूर्ण केले. त्याने 59 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर आलेल्या बेन स्टोक्स याने जो रूटची साथ देत जोरदार फटकेबाजी सुरू केली. त्याने केवळ 76 चेंडूमध्ये 84 धावांची खेळी केली. रूटने 60 धावा केल्या. अखेरीस जोस बटलर व डेव्हिड विली यांनी काही मोठे फटके मारत संघाला 337 पर्यंत पोहोचवले.
पाकिस्तान संघासाठी हारिस रौफ याने सर्वाधिक तीन तर शाहीन व मोहम्मद वसीम यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी 338 धावांचे आव्हान 38 चेंडूमध्ये पूर्ण करावे लागेल.
(England Post 337 Runs Against Pakistan In ODI World Cup Stokes Root Bairstow Shines)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्धचा सामना माझा कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो, इंग्लंडच्या खेळाडूचं धक्कादायक विधान
शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या नात्यावर लागली मोहर! खास व्यक्तिने महत्वाची माहिती