---Advertisement---

IND vs ENG । दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची रणनीती ठरली; मॅक्युलम म्हणतोय, ‘घाबरत नाही…’

On: बुधवार, जानेवारी 31, 2024 3:49 PM
Brendon McCullum
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने 28 धावांनी जिंकला. यजमान भारतासाठी पहिल्या सामन्यातील पराभव निराशाजनक होता. टॉम हार्टिली याने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सात विकेट्सचा हॉल नावावर केला. मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाटी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यायने आपल्या संघाची रणनीती सांगितली आहे.

हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन-तीन फिरकी गोलंदाजांना संधी दिली होती. टॉम हार्टली याने शेवटच्या डावात 7 विकेट्स नावावर करत भारताला लक्ष्य गाठू दिले नाही. आता दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ तयारी करत आहे. इंग्लंडची रणनीती ठरली आहे. प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम (Brendon McCullum) याने सांगितल्याप्रमाणे त्यांचा संघ भारतीय खेळपट्टीसाठी तयार आहे. तसेच भारतीय फिरकीपटूंना खेळताना त्यांचे फलंदाज घाबरत नाहीत.

मॅख्युलम विशाषापट्टणम कसोटीआधी म्हणाला, “पहिल्या कसोटी सामन्यात खेळपट्टीवर चेंडू स्पिन होत होता. पुढच्या सामन्यातही तसे झाले, तरी आम्ही भीत नाही. कारण आमच्या संघाकडे असणारे संतुलन खरोखर जबरदस्त आहे.” दरम्यान, पहिल्या कसोटीत टॉम हार्टलीने भारतीय फलंदाजांचा घाम काढला. हार्टलीप्राणे शोएब बशीर देखील संघासाठी अशीच भूमिका पार पाडू शकतो, असे मॅक्युलम म्हणाला. या दोघांनाही देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव कमी आहे. पण दिलेल्या संधीचे सोने हे दोन्ही खेळाडू करू शकतात. वेळेत विजा मिळाला नाही, म्हणून शोएब पहिल्या कसोटीत खेळू शकला नव्हता.

“शोएब आमच्यासोबत अबू धाबी कॅम्पमध्ये होता. त्याने खूप चांगले प्रदर्शन केले होते. तो संघात फिट बसतो. टॉम हार्टलीप्रमाणेच शोएबकडे प्रथम श्रेणी क्रिकेटचा जास्त अनुभव नाहीये. पण मला पूर्ण विश्वास आहे की, त्याच्याकडे असलेली शैली वापरून आम्ही सामना जिंकू शकतो,” असे मॅक्युलम पुढे म्हणाला.

महत्वाच्या बातम्या – 
मोठी बातमी! ACCच्या अध्यक्षपदी शहांची फेरनिवड, ICC अध्यक्षपदाबाबत संभ्रम
आईविषयी चुकीच्या बातम्यांनी संतापला विराटचा भाऊ, गैरसमज दूर करण्यासाठी केली इस्टा पोस्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---