नाॅटिंगहॅम | बुधवारी इंग्लंड विरुद्ध आॅस्ट्रेलिया तिसऱ्या वनडेत इंग्लंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. यापुर्वीही हा विक्रम त्यांच्याच नावावर होता.
इंग्लंडने ४६ षटकांत धावा करत क्रिकेट विश्वात ४५० धावा करणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला आहे. यापुर्वी ३० आॅगस्ट २०१६मध्ये याच संघाने पाकिस्तान संघाविरुद्ध ५० षटाकांत ३ बाद ४४४ धावा केल्या होत्या.
आज त्यांनी ४६ षटकांत ४५० धावा केल्या असून अजूनही ५ षटके बाकी आहेत.
या सामन्यात इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने नाबाद १४४ तर जाॅनी बेरस्ट्रोने १३९ धावा केल्या.






