इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. पहिला सामना अनिर्णीत राहिला होता; तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १५१ धावांनी विजय मिळवला होता. तसेच मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंड संघात मोठा बदल करण्यात आला आहे.
कसोटी मालिकेतील तिसरा सामना येत्या २५ ऑगस्टपासून हेडिंग्लेच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल. तर इंग्लंड संघ विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान इंग्लंड संघाने अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला आगामी सामन्यातून संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोईन अलीला द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धा खेळण्याची अनुमती देण्यात आली आहे, ज्यामुळे त्याला भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून बाहेर करण्यात आले आहे. मोईन अली हा बर्मिंघम फिनिक्स संघाचा कर्णधार आहे. या संघाने द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. हा सामना २१ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.
बर्मिंघम फिनिक्स संघासोबत अंतिम सामन्यात कुठला संघ खेळणार आहे? हे शुक्रवारी (२० ऑगस्ट) कळणार आहे. कारण शुक्रवारी साउदर्न ब्रेव आणि ट्रेंट रॉकेट्स या दोन्ही संघांमध्ये एलिमीनेटरचा सामना पार पडणार आहे. यातील विजेता संघ अंतिम सामन्यासाठी मैदानावर उतरेल. (England released Moeen Ali from third test against india)
तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड संघामध्ये मोठे बदल
लॉर्ड्स कसोटीत पराभूत झाल्यानंतर इंग्लंड संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मोठे बदल केले आहे. विराट कोहलीला ९ वेळेस बाद करणाऱ्या मोईन अलीला द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धा खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर पहिल्या दोन कसोटी सामन्यात फ्लॉप ठरलेले इंग्लंडचे फलंदाज जॅक क्रॉलि, जॅक लिच आणि डोम सिब्ली यांना संघाबाहेर करण्यात आले आहे. तर टी-२० क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज डेविड मलानचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच वेगवान गोलंदाज साकिब महमूदला देखील पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीला पछाडत विराटने ‘तो’ दुर्लक्षित विक्रम केला आपल्या नावे
दुर्दैवच! संधी असूनही मयंकची दुखापत नडली, आता ‘या’ खेळाडूंमुळे कसोटीतील जागा कायमची गेली?
दिल्ली कॅपिटल्सने रिलीझ केलेल्या गोलंदाजाची ‘डबल लॉटरी’, धोनीच्या सीएसकेत मिळाली जागा?