Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बॅझबॉल की जय! न्यूझीलंडपासून पाकिस्तानपर्यंत इंग्लंडने सगळ्यांना चोपलयं; कसोटी क्रिकेटवर करतायेत राज्य

December 20, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/England Cricket

Photo Courtesy: Twitter/England Cricket


इंग्लंड क्रिकेट संघाने पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान संघाचा पराभव केला. इंग्लंडने ही कसोटी मालिका 3-0 अशी आपल्या नावे केली कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर पराभूत करणे ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी गोष्ट मानली जाते. इंग्लंडने पाकिस्तानात येऊन ही गोष्ट साध्य करून दाखवली आहे. या कामगिरीने इंग्लंडने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, तो आजच्या घडीला जगातील सर्वोत्तम कसोटी संघ आहेत.

या मालिकेत पाकिस्तानचा क्रिकेट संघ इंग्लंडसमोर कुठेही टिकला नाही. रावळपिंडी येथील सामना अनिर्णित अवस्थेकडे चालला असताना इंग्लंडने आक्रमक क्रिकेट खेळत हा सामना आपल्या नावे केला. मुलतान आणि कराचीमध्येही त्यांनी हीच आक्रमकता दाखवली. त्यामुळे इंग्लंडला पाकिस्तानला व्हाईट वॉश देण्यात यश आले.

इंग्लंडने मागील सहा महिन्याच्या काळात विजयाची अक्षरशः रांग लावली आहे. ब्रेंडन मॅकलम याची प्रशिक्षकपदी तर अष्टपैलू बेन स्टोक्स याची कर्णधारपदी नियुक्ती केल्यानंतर हा बदल दिसून आला. अगदी आक्रमकपणे कसोटी क्रिकेट खेळत त्यांनी आपल्या पहिल्याच मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेलाही 2-1 अशा फरकाने मात दिली.

भारताविरुद्धच्या एकमेव कसोटीत विजय मिळवत त्यांनी 2021 मध्ये अपूर्ण राहिलेल्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. त्यानंतर आता पाकिस्तानला त्यांच्याच देशात जाऊन क्लीन स्वीप करण्याचा कारनामा त्यांनी केला. स्टोक्स याच्या नेतृत्वात खेळलेल्या 10 पैकी 9 सामन्यात इंग्लंडने विजय संपादन केला. त्यांच्या याच खेळाच्या आक्रमक स्वरूपाला बॅझबॉल क्रिकेट म्हटले जाऊ लागले आहे. पुढील वर्षी होत असलेल्या ऍशेस मालिकेतही अशीच कामगिरी करण्याचे आव्हान इंग्लंड संघासमोर असेल.

(England Show Fabulous Display Of BazzBall Cricket)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची नाचक्की! ब्रिस्बेन कसोटी जिंकूनही व्हावे लागले अपमानित; वाचा संपूर्ण प्रकरण
बॉक्सिंग डे कसोटीत वॉर्नला वाहिली जाणार खास श्रद्धांजली; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केले नियोजन


Next Post
Inter District Football Championship

नागपूरने पुण्याचा पराभव करत पटकावले आंतर-जिल्हा फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद

Photo Courtesy: Twitter/ICC

'कर्णधार म्हणून पॉंटिंगपेक्षा माहीच उजवा'; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने मान्य केले धोनीचे मोठेपण

Arjun Tendulkar

अर्जुन नक्कीच यशस्वी क्रिकेटपटू होणार! सचिनच्याच शिष्याने व्यक्त केला विश्वास

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143