आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मधील 20वा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे. स्पर्धेतील आपला तिसरी सामना खेळण्यासाठी हे संघ आमने सामने असतील. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर हा सामना शनिवारी (21 ऑक्टोबर) रंगणार आहे. दिवसातील हा दुसरा सामना असून दुपारी दोन वाजता खेळ सुरू होईल.
वनडे विश्वचषक 2023 (CWC 2023) मध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघ शनिवारी (21 ऑक्टोबर) पहिल्यांदा एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. याआधी या दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन-तीन सामने खेळले आहेत. इंग्लंडने तीन पैकी फक्त एक सामना जिंकला आहे. विश्वचषकातील पहिल्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला, तर तिसऱ्या सामन्यात आपल्या तुलनेत दुबळ्या दिसणाऱ्या अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारला.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाने खेळलेल्या तीन विश्वचषक सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. स्पर्धेतील पहिला आणि दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकला होता. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्यांना नवख्या समजल्या जाणाऱ्या नेदर्लंड्स संघाने पराभवाची धूळ चारली. अशात अफगाणिस्तान आणि नेदर्लंड्सकडून पराभव स्वीकारणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघातील सामना रोमांचक ठरू शकतो.
वनडे विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. यातील 4 सामने इंग्लंडने, तर तीन सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. वनडे क्रिकेटमधील एकंदरीत आकडेवारी पाहिली, तर उभय संघ आतापर्यंत 69वेळा एकमेकांसोबत खेळले आहेत. यातील 30 सामने इंग्लंडने, तर 33 सामने दक्षिण आफ्रिका संघाने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला, तर पाच सामना अनिकाली राहिले.
पिच रिपोर्ट –
उभय संघांतील शनिवारचा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. याठिकाणी 32000 प्रेक्षकांना मैदानातून सामन्याचा आनंद घेता येऊ शकतो. मुंबई इंडियन्सचे हे होम ग्राउंड आहे. याठिकाणी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत मिळते. फिरकी गोलंदाजांनाही याठिकाणी स्पीन आणि बाऊंस चांगल्या पद्धतीचा मिळतो. स्टेडियम समुद्रकिनाऱ्याजवळ असल्यामुळे नवीन चेंडूने गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये निर्णायक ठरू शकतात. याठिकाणी खेळल्या जाणाऱ्या सामन्यांपैकी 60टक्के सामने प्रथम गोलंदाजी करणारा संघ जिंकतो, असे आकड्यांमधून दिसते.
सामन्याचे थेट प्रक्षेपण
भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. सामन्याच्या नाणेफेकीची वेळ 1.30 वाजता आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तसेच, डिझ्नी प्लस हॉटस्टार ऍपवर या सिनेमाची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. (England-South Africa clash in 20th match of World Cup, know exclusive statistics and pitch report)
यातून निवडली जाणार प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रबरासी, रबाडा डुसेन, लिझाद विल्यम्स.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानचे जोरदार कमबॅक! वॉर्नर-मार्शच्या शतकानंतर ढासळली ऑस्ट्रेलिया, तरीही लक्ष्य मोठेच
मोठी बातमी: विश्वचषकादरम्यानच भारतीय क्रिकेटपटूचा क्रिकेटला टाटा-बायबाय, आता दिसणार नाही…