---Advertisement---

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूचे होणार पुनरागमन

---Advertisement---

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर बऱ्याच काळानंतर संघात परतला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅम एजबॅस्टन येथे खेळला जाईल.

इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी नुकताच संघ जाहीर केला आहे. मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी संघ नंतर जाहीर केला जाईल. यापूर्वी इंग्लंडने फक्त पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला होता. भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडने जोफ्रा आर्चरचा संघात समावेश केला आहे.

30 वर्षीय जोफ्रा आर्चर फेब्रुवारी 2011 नंतर पहिल्यांदाच कसोटी संघात परतणार आहे. आर्चरने काउंटी चॅम्पियनशिपच्या शेवटच्या फेरीत डरहम विरुद्ध ससेक्ससाठी रेड-बॉल क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. आर्चरने 2021 मध्ये भारताविरुद्ध शेवटची कसोटी खेळली.

लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताकडून पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने 101 धावा, शुभमन गिलने 147 धावा आणि रिषभ पंतने 134 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंड संघाने पहिल्या डावात 465 धावा केल्या. इंग्लंडकडून ऑली पोपने 106 आणि हॅरी ब्रूकने 99 धावा केल्या.

पहिल्या डावात भारताला 6 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियाने 364 धावा केल्या आणि ब्रिटिशांना 371 धावांचे आव्हान दिले. यावेळी भारताकडून केएल राहुलने 137 धावा आणि रिषभ पंतने 118 धावा केल्या. म्हणजे पंतने दोन्ही डावात शतक झळकावले.

इंग्लंडसमोर 371 धावांचे आव्हान होते जे ब्रिटिशांनी सहज गाठले. शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 350 धावांची आवश्यकता होती. इंग्लंडकडून बेन डकेटने 149 धावा, जॅक क्रॉलीने 65 धावा आणि जो रूटने नाबाद 53 धावा केल्या. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज जेमी स्मिथ 44 धावांवर नाबाद राहिला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---