---Advertisement---

IND vs ENG: इंग्लंडचा ऐतिहासिक विजय! भारताचा 5 विकेट्सने पराभव

On: मंगळवार, जून 24, 2025 11:03 PM
---Advertisement---

India vs England First Test Match Result: भारत विरूद्ध इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने भारताचा 5 विकेट्सने धुव्वा उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. (IND vs ENG Leeds Test Result)

लीड्स कसोटीच्या चौथ्या डावात इंग्लंडला 371 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी पाचव्या दिवशी 5 विकेट्स शिल्लक असतानाच गाठले. या सामन्यात भारताकडून एकूण 5 शतके झळकावली गेली. दरम्यान उपकर्णधार रिषभ पंतने दोन्ही डावांत शतक ठोकले, तर कर्णधार शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने प्रत्येकी 1-1 शतक झळकावले. असे असूनही, चौथ्या डावात भारतीय संघ 371 धावांचे विशाल लक्ष्य वाचवू शकला नाही.

टाॅस जिंकून इंग्लंडने प्रथम भारतीय संघाला फंलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. यादरम्यान यशस्वी जयस्वालने 101 धावांची खेळी केली, तर केएल राहुल 42 धावांवर बाद झाला. साई सुदर्शन आपल्या कसोटी पदार्पणात शून्यावर तंबूत परतला. आपल्या कर्णधारपदाच्या पदार्पणात शुबमन गिलने 147 धावांची शानदार खेळी केली, तर पंतनेही 134 धावांचे योगदान दिले. या 3 शतकांच्या जोरावर भारतीय संघ 471 धावांपर्यंत पोहोचू शकला. पहिल्या डावात भारताचे शेवटचे 6 फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले.

इंग्लंड संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी आला, तेव्हा जॅक क्रॉलीला पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, बेन डकेटच्या 62 धावा आणि ओली पोपच्या 106 धावांच्या जोरावर इंग्लंडने दमदार पुनरागमन केले. हॅरी ब्रूकनेही दमदार खेळ दाखवला, पण प्रसिद्ध कृष्णाने त्याला 99 धावांवर बाद केले. इंग्लंडने 276 धावांवर 5 विकेट्स गमावल्या होत्या, त्यांच्यासाठी 400 धावा करणेही कठीण वाटत होते. मात्र, जेमी स्मिथच्या 40 धावा आणि ख्रिस वोक्सच्या 38 धावांच्या खेळीमुळे इंग्लंड 465 धावांपर्यंतच पोहोचू शकला. जसप्रीत बुमराहने गोलंदाजीत 5 विकेट्स घेतल्या, तरीही भारताला फक्त 6 धावांचीच आघाडी मिळाली.

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, करुण नायर फ्लॉप ठरले. साई सुदर्शनने यावेळी 30 धावांचे योगदान दिले. केएल राहुल या डावात चमकला, ज्याने खूप संयमाने काम घेऊन 137 धावांची खेळी केली. हा डाव रिषभ पंतच्या नावावर राहिला, ज्याने या सामन्याच्या दोन्ही डावांत शानदार शतक झळकावले. दोन्ही डावांत शतक ठोकणारा पंत कसोटी इतिहासातील केवळ दुसरा यष्टीरक्षक-फलंदाज बनला. पंतने याच सामन्यात भारतासाठी कसोटीत सर्वाधिक शतके बनवण्याचा एमएस धोनीचा रेकाॅर्ड मोडीत काढला. (Pant breaks MS Dhoni’s record)

इंग्लंडने या 5 विकेट्सच्या विजयाने इतिहास रचला आहे. इंग्लंडने आपल्याच देशात यशस्वीरित्या पाठलाग केलेला हा दुसरा सर्वात मोठा स्कोअर आहे. आपल्या मैदानावर इंग्लंडचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग देखील भारताच्या विरुद्धच आला होता, जेव्हा 2022 मध्ये इंग्लंडने बर्मिंगहॅम कसोटीत 378 धावांचे लक्ष्य पार केले होते. बेन डकेटच्या 149 धावा आणि जॅक क्रॉलीच्या 65 धावांच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी रचली होती. ओली पोप आणि हॅरी ब्रूक फ्लॉप ठरले, पण जो रूटने नाबाद 53 धावा करून इंग्लंडच्या या ऐतिहासिक विजयात खूप मोठे योगदान दिले. (England Wins by 5 Wickets)

दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना (2 ते 6) जुलै दरम्यान एजबेस्टन बर्मिंगहॅम या मैदानावर खेळला जाणार आहे. त्यामुळे भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्यात पुनरागमन करतो की नाही? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---