---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, आयपीएल खेळणारे क्रिकेटपटू संघाबाहेर; वाचा कारण

On: गुरूवार, मे 20, 2021 8:47 AM
---Advertisement---

आयपीएलचा चौदावा हंगाम कोरोनाच्या कारणाने स्थगित करावा लागला. त्यानंतर स्पर्धात्मक क्रिकेट पाण्यापासून दूर असलेल्या चाहत्यांसाठी पहिली मालिका म्हणून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका जून महिन्याच्या सुरुवातीला सुरु होत आहे. न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचला असून, यजमान इंग्लंडने देखील या मालिकेसाठी रणसिंग फुंकले. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) या मालिकेसाठी बुधवारी (१९ मे) आपला संघ जाहीर केला. या संघनिवडीत मात्र बोर्डाने काही धक्कादायक निर्णय घेतलेले दिसले.

या खेळाडूंना मिळाले नाही संघात स्थान
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान २ जूनपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. तत्पूर्वी, ईसीबीने या मालिकेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. विशेष म्हणजे या संघात आयपीएल खेळून गेलेल्या खेळाडूंना स्थान दिले गेले नाही. या खेळाडूंचे विलगिकरण पूर्ण झाल्यानंतर पुरेसा आराम मिळण्यासाठी त्यांना आराम दिला गेल्याचे बोर्डाने स्पष्ट केले. खेळाडू आपल्या इच्छेनुसार आपल्या काउंटी संघासाठी खेळू शकतात.

नुकत्याच स्थगित झालेल्या आयपीएलमधून इंग्लंडला गेलेल्या खेळाडूंमधील जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, मोईन अली व ख्रिस वोक्स हे खेळाडू इंग्लंडच्या कसोटी संघाचे नियमित सदस्य आहेत.

या नव्या खेळाडूंना मिळाली संधी
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंड संघात ग्लोसेस्टरशायरचा यष्टीरक्षक फलंदाज जेम्स ब्रेसी व ससेक्सचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन यांना प्रथम संधी देण्यात आली आहे. सॉमरसेटचा अष्टपैलू खेळाडू क्रेग ओव्हरटन याचे संघात पुनरागमन झाले. त्याने आपला अखेरचा सामना २०१९ मध्ये खेळला होता. दुखापतग्रस्त बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर यांचा संघनिवडीसाठी विचार केला गेला  नाही. मालिकेतील पहिला सामना लंडन येथे तर दुसरा सामना बर्मिंघम येथे खेळविण्यात येईल.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ-
जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, झॅक क्राऊली, रोरी बर्न्स, जेम्स ब्रेसी, क्रेग ओव्हरटन, ओली रॉबिन्सन, बेन फोक्स, जॅक लिच, डॅन लॉरेन्स, ओली पोप, डॉम सिब्ली, मार्क वूड व ओली स्टोन.

महत्त्वाच्या बातम्या-

‘फर्स्ट स्टॉप मुंबई’; इंग्लंडला जाण्यापूर्वी अश्विनसह ‘या’ भारतीयांनी गाठली मुंबई, पाहा खास फोटो

WTC फायनलपुर्वी टीम इंडियाचा मोठा निर्णय, त्रिशतक करणाऱ्या ‘या’ शिलेदाराची साहाचा बॅकअप म्हणून नियुक्ती

आयपीएलमध्ये एकाच षटकात ५ खणखणीत षटकार ठोकत प्रकाशझोतात आलेला ‘राहुल तेवतिया’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---