मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील तिसरा कसोटी सामना पार पडला. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली होती. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवत विजयाची हॅट्रिक केली आहे. यासह मालिकेत ३-० ची विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान फलंदाजीमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरलेल्या इंग्लंड संघाच्या नावे नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.(England team equals in his own unwanted record)
या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंड संघातील फलंदाज डेविड मलान, जॅक लीच, मार्क वूड आणि ऑली रॉबिन्सन खाते देखील उघडू शकले नव्हते, तर सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज हसीब हमिद देखील शून्यावर बाद झाला होता. यासह इंग्लंड संघाच्या नावे नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
इंग्लंडचे क्रिकेटपटू २०२१ यावर्षी तब्बल ५४ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतले आहेत. १४४ वर्षांच्या इतिहासात इंग्लंड संघाने दुसऱ्यांदा हा कारनामा केला आहे. यापूर्वी इंग्लंडचे संघाचे क्रिकेटपटू १९९८ मध्ये देखील ५४ वेळेस शून्यावर बाद झाले होते.
अधिक वाचा – इंग्लंडच्या संघाचा २०२१ मध्ये सर्वाधिक ‘डक’चा नकोसा विक्रम, पण ‘या’ ५ पठ्ठ्यांनी राखली लाज
इंग्लंड संघाने २०२१ मध्ये आपल्याच विक्रमाची बरोबरी केली आहे. यावर्षी इंग्लंडचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. मायदेशात असो किंवा परदेशात, इंग्लंड संघाला कसोटी मालिका जिंकण्यात यश आले नाहीये. तसेच एका वर्षात कसोटीमध्ये सर्वाधिक खेळाडू शून्यावर बाद होणाऱ्या संघांच्या यादीत वेस्ट इंडिज संघ तिसऱ्या स्थानी आहे. वेस्ट इंडिज संघातील फलंदाजी २००० साली ४४ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतले होते.
चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलिया संघ आहे. १९९९ मध्ये ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाज ४० वेळेस शून्यावर माघारी परतले होते. तर पाचव्या स्थानी भारतीय संघ आहे. २०१८ मध्ये भारतीय संघातील फलंदाज ३९ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतले होते.
एका वर्षात कसोटीमध्ये सर्वाधिक खेळाडू शून्यावर बाद होणारे संघ
५४ वेळेस – इंग्लंड, १९९८
५४ वेळेस – इंग्लंड, २०२१*
४४ वेळेस – वेस्ट इंडिज , २०००
४० वेळेस – ऑस्ट्रेलिया, १९९९
३९ वेळेस – भारत, २०१८
महत्वाच्या बातम्या :
”स्टोक्समध्ये ती बात राहिली नाही”; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने उडविली खिल्ली
विश्वचषक आणि ऍशेस जिंकवूनही क्रिकेट ऑस्ट्रेलिया हटविणार कोच लँगरला? वाचा सविस्तर
हे नक्की पाहा : टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं |






