भारत आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात झालेली अवस्था पाहून इंग्लंडने मोईन अलीला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी तो संघातील बाकी खेळाडूंसोबत सहभागी झाला. त्याने त्याच्या सरावाला देखील सुरुवात केली आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत ठरला. मालिकेतील दुसरा सामना 12 ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. हा सामना लाॅड्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
इंग्लंड संघव्यवस्थापन मोईन अलीला दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान देऊ शकते. मोईन अली फिरकी गोलंदाजीसोबतच खालच्या फळीत फलंदाजीही करू शकतो.
मोईन 2019 च्या ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर इंग्लंडमध्ये एकही कसोटी सामना खेळला नाही. त्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमधून अनिश्चीत काळासाठी विश्रांती घेतली होती. त्यानंतर त्याने भारताविरूद्ध चेन्नइमध्ये कसोटी सामन्यात सहभाग घेतला होता. या सामन्यात त्याने 49 धावा करत आठ विकेट घेतल्या होत्या.
मागच्यावेळी भारताने जेव्हा इंग्लंड दौरा केला होता, तेव्हा मोईन अली इंग्लंड संघाचा भाग होता. त्याने कसोटी सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले होते. मोईनने तेव्हा कसोटी सामन्यात 119 धावा आणि 12 विकेट्स चटकावल्या होत्या. भारताविरुद्ध त्याचे आकडे चांगले आहेत. त्याने भारताविरुद्ध 678 धावe आणि 49 विकेट घेतल्या आहेत.
इंग्लंडचा संघ-
जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रॉली, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेंस, जॅक लीच, क्रेग ओवरटन, ओली पोप, ओली रॉबिंसन, डाॅम सिबली, मार्क वुड.
महत्त्वाच्या बातम्या –
नॉटिंघम कसोटीत भारत-इंग्लंड संघांनी मारून घेतली आपल्याच पायावर कुऱ्हाड, ‘या’ कारणासाठी झाला मोठा दंड
नॉटिंघम कसोटीतील भेदक गोलंदाजीचा बुमराहला झाला फायदा, नव्या क्रमवारीत पोहोचला ‘या’ स्थानावर
भारत-इंग्लंड दोन्ही संघांना लॉर्ड्स कसोटीपूर्वी बसले जबरदस्त धक्के, ‘हे’ वेगवान गोलंदाज झाले जखमी