---Advertisement---

शतक हुकलं पण किर्तीमान केला, इंग्लिश कर्णधाराच्या जबराट कामगिरीने विराटसेनेची चिंता शिगेला!

On: रविवार, मे 16, 2021 3:49 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात सुरुवातीला त्यांना न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. १८ ते २२ जून दरम्यान साउथम्पटन येथे हा सामना होणार आहे. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेपुर्वी यजमान इंग्लंड संघाचे खेळाडू काउंटी क्रिकेट खेळत आहेत.

या स्पर्धेद्वारे इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूट हादेखील सराव करत आहे. या स्पर्धेतील त्याच्या दमदार फलंदाजीने विराट आणि कंपनीची चिंता वाढवली आहे.

काउंटी क्रिकेट स्पर्धेत यॉर्कशायर संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या रुटचे शतक अवघ्या एका धावेने हुकले आहे. परंतु त्याच्या योगदानामुळे यॉर्कशायर संघ पहिल्या डावात २२८ धावा उभारु शकला. सोबतच त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंदही झाली आहे.

यॉर्कशायर संघाची वरची फळी ढासळल्यानंतर जो रुट खंबीरपणे मैदानावर झुंज देत राहिला. त्याने १०९ चेंडूंता सामना करताना ६ चौकारांच्या मदतीने ९९ धावांची खेळी केली. अखेर ७४.६ षटकात प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज डॅनियल डॉटवेटने त्याला त्रिफळाचीत केल्याने अवघ्या एका धावेने तो शतकापासून वंचित राहिला.

असे असले तरीही काउंटी क्रिकेटच्या २०२१ च्या हंगामात सर्वात जलद १००० धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याच्यानंतर या यादीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाब्यूशानेचा क्रमांक लागतो. तो १० सामन्यात ८५३ धावा करत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँचेस्टर

महत्त्वाच्या बातम्या-

संघ निवडकर्त्यांशी पंगा घेणे पडले महागात, वेळेपुर्वीच ‘या’ ५ भारतीयांची कारकिर्द आली संपुष्टात

धोनीच्या काळात हिरो असलेला ‘कुलदीप’ आता राहतोय दुर्लक्षित; ‘या’ ३ कारणांमुळे करावा लागतोय संघर्ष

सध्याचा दमदार फॉर्म अन् भारताविरुद्धची शानदार कामगिरी, कसोटी मालिकेत इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू घालणार धुमाकूळ!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---