---Advertisement---

वेस्ट इंडिजप्रमाणेच इंग्लंड दौऱ्यातून पाकिस्तानच्या ‘या’ दोन दिग्गज खेळाडूंची माघार

On: शुक्रवार, जून 12, 2020 9:25 PM
---Advertisement---

मुंबई । पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 3 कसोटी आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. या दौऱ्यासाठी पाकिस्तान संघातील दोन खेळाडूंनी जाण्यास नकार दिला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि मधल्या फळीतील फलंदाज हॅरिस सोहेल यांनी वैयक्तिक कारणामुळे इंग्लंड दौऱ्यात जाण्यास नकार दिला असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिले आहे.

मोहम्मद आमीर दुसऱ्यांदा वडील होणार असल्याने तो इंग्लंड दौऱ्यास जाणार नाही तर हॅरिस सोहेल याचे इंग्लंड दौऱ्यावर न जाण्याचे खरे कारण अद्याप कळाले नाही. कौटुंबिक कारणामुळे तो जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. 

या दौऱ्यासाठी पाकिस्तान संघातील 29 खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱयावर जाणार आहे. यासोबतच 14 लोकांचा सपोर्ट स्टाफ देखील असणार आहे. इंग्लंडला जाण्यासाठी पाकिस्तानच्या संघासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या दौऱयाची सुरुवात कधी आणि कोठे होणार आहे याबाबत अद्यापही माहिती जाहीर करण्यात आली नाही.

मोहम्मद आमीरने आतापर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघाकडून 36 कसोटी, 61 वनडे आणि 48 टी ट्वेंटी सामन्यात अनुक्रमे 119, 81 व 59 बळी घेतले आहेत. हॅरिस सोहेल पाकिस्तान संघाकडून खेळताना 14 कसोटी 41 वनडे सामन्यात 1614 धावा केल्या आहेत. त्याने कसोटी आणि वनडे मध्ये प्रत्येकी 2 शतके ठोकली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---