---Advertisement---

तिसऱ्या कसोटीत कांगारूंची पिसे काढणाऱ्या खेळाडूवर स्टोक्स फिदा; म्हणाला, ‘अशा खेळाडूमुळेच मजबूती…’

On: सोमवार, जुलै 10, 2023 12:58 PM
Ben-Stokes-And-Mark-Wood-And-Chris-Woakes
---Advertisement---

इंग्लंड संघाने हेडिंग्ले कसोटीत 3 विकेट्सने विजय मिळवत ऍशेस मालिका 2023मध्ये दमदार पुनरागमन केले. पहिल्या दोन कसोटीत इंग्लंडला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे इंग्लंडसाठी हा सामना जिंकणे खूपच गरजेचे होते. या सामन्यात इंग्लंडसाठी मार्क वूड याने फलंदाजी आणि गोलंदाज दोन्ही विभागात उल्लेखनीय प्रदर्शन केले. संघाच्या विजयानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने मार्क वूडचे कौतुक केले. तसेच, त्याला एक खास खेळाडूही म्हटले.

काय म्हणाला स्टोक्स?
बेन स्टोक्स (Ben Stokes) याने हेडिंग्ले (Headingley) कसोटी सामना जिंकल्यानंतर म्हटले की, “या विजयामुळे खूपच आनंदी आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही फलंदाजी किंवा गोलंदाजी काहीही करू शकत होतो. मिचेल मार्श याने पहिल्या डावात शानदार फलंदाजी केली आणि आम्हाला सामन्यापासून दूर नेले. या मैदानावरील आऊटफील्ड चांगली आहे. मार्क वूड आणि ख्रिस वोक्स यांनी पुनरागमनासोबतच शानदार खेळ दाखवला. मला वोक्सचा खेळ पाहून बिल्कुल वाटले नाही की, तो दीर्घ काळानंतर कसोटी क्रिकेट खेळत आहे.”

पुढे बोलताना स्टोक्स म्हणाला की, “मार्क वूड याच्यासारखा खेळाडू संघात असल्यामुळे तुम्हाला मजबूती मिळते. तो सलग 95 मैल प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्यासोबतच बॅटमधूनही खालच्या फळीत महत्त्वाचे योगदान देतो. फक्त 8 चेंडूत 24 धावा करणे सोपी गोष्ट नाहीये. असे तुम्ही प्रत्येक वेळी करण्यात यशस्वी होत नाहीत.”

पुढचा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा
पुढील कसोटी सामन्याविषयी बोलताना स्टोक्स म्हणाला की, “दोन्ही संघांसाठी चौथा सामना आता महत्त्वाचा असेल. सर्वांना चांगला खेळ दाखवायचा आहे. 9 दिवसांचा ब्रेक मिळाल्याने आम्हालाही विश्रांतीची संधी मिळेल. हेडिंग्लेमध्ये येऊन खेळणे आमच्यासाठी शानदार राहिले. येथील चाहत्यांचा आम्हाला चांगला पाठिंबा मिळतो.”

ऍशेस 2023 (Ashes 2023) मालिकेतील चौथा कसोटी सामना 19 जुलैपासून मॅनचेस्टर येथील मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलिया मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करेल, तर इंग्लंड मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल. (england vs australia skipper ben stokes praise mark wood performance after winning headingley test by 3 wickets)

महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या ‘त्या’ सर्वात मोठ्या विक्रमाला स्टोक्सकडून तडा, नवा कीर्तिमान रचत घडवला इतिहास
तब्बल ‘एवढ्या’ देशांचा दौरा करणार वर्ल्डकप ट्रॉफी, पँगाँग लेक अन् शांती स्तूपला दिली भेट; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---