बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवारपासून (1 आॅगस्ट) सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पहिल्या डावात सुरुवातीलाच तीन धक्के बसले आहेत.
भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजय, शिखर धवन आणि केएल राहुल हे तीन फलंदाज लवकर बाद झाले आहेत. या तिघांनाही इंग्लंडचा युवा गोलंदाज सॅम करनने बाद केले.
मुरली विजयने शिखर धवनबरोबर चांगली सुरुवात केली होती. या दोघांनी 50 धावांची सलामी भागिदारीही रचली. मात्र डावाच्या 14 व्या षटकात चौथ्या चेंडूवर विजयला 20 धावांवर असताना करनने पायचीत बाद केले.
त्यानंतर लगेचच त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला राहुलही त्रिफळाचीत झाला. त्याने फक्त चार धावा केल्या.
हे दोघे बाद झाल्यानंतर करनने त्याच्या पुढच्या षटकात तर डावाच्या 16 व्या षटकात शिखरला दुसऱ्या स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या डेव्हिड मलानकडे झेल देण्यास भाग पाडले.
भारताने पहिल्या डावात 17 षटकात 3 बाद 61 धावा केल्या आहेत. तसेच भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे नाबाद खेळत आहेत.
तत्पूर्वी इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 287 धावा केल्या आहेत. भारताकडून या डावात आर अश्विनने 62 धावात सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच अन्य गोलंदाजांपैकी मोहम्मद शमी(3/64), उमेश यादव (1/56) आणि इशांत शर्मा(1/46) यांनी विकेट घेतल्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–तीन दिग्गज भारतीय माजी क्रिकेटपटू इम्रान खानच्या शपथ विधीला लावणार हजेरी
–पहिल्या सामन्यातच दडलाय भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा निकाल