इंग्लंडने भारताविरुद्ध नॉटिंगघमला झालेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात १७ धावांनी विजय मिळवला. असे असले तरी भारताच्या सूर्यकुमार यादवने शतकी खेळी करत सर्वांची मनं जिंकली आहेत. त्याने ५५ चेंडूत १४ चौकार आणि ६ षटकारांसह ११७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १४ व्या षटकांत मारलेला षटकार लक्षवेधी ठरला.
इंग्लंडने भारताला २१६ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाल्यानंतरही सूर्यकुमारने शानदार खेळीसह डाव सावरला होता. यादरम्यान त्याने रिचर्ड ग्लिसनविरुद्ध १४ व्या षटकात थर्ड मॅनच्या दिशेला अप्रतिम फटका मारत षटकार वसूल केला.
https://twitter.com/hh60890287/status/1546338241229467649
त्याच्या या षटकाराचे कौतुक होत असून व्हिडिओही व्हायरल होत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
(ही बातमी ८० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)






