लंडन। आजपासून(24 जूलै) लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात चार दिवसीय कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडचा पहिला डाव सामन्याच्या पहिल्याच सत्रात 23.4 षटकात 85 धावांवर संपूष्टात आला आहे.
आयर्लंडकडून पहिल्या डावात टिम मुर्तघने 9 षटके गोलंदाजी करताना फक्त 13 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मार्क आदेरने 7.4 षटके गोलंदाजी करताना 32 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आणि बॉयड रँकिनने 3 षटकात 5 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडकडून या डावात केवळ जो डेन्ली(23), सॅम करन(18) आणि ऑली स्टोन(19) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. त्यांच्या व्यतिरिक्त इंग्लंडच्या एकाही फलंदाजाने दोन आकडी धावसंख्या पार केली नाही. इंग्लंडचे जॉनी बेअरस्टो, मोईन अली आणि ख्रिस वोक्स या फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
तसेच या सामन्यातून कसोटी पदार्पण करणारा जेसन रॉय 5 धावा करुन बाद झाला. तर त्याच्याबरोबर सलामीला फलंदाजीला उतरलेल्या रॉरी बर्न्स 6 धावांवर बाद झाला. त्याचबरोबर इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटला केवळ 2 धावा करता आल्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…म्हणून विराट कोहलीने घेतली नाही विंडीज दौऱ्यासाठी विश्रांती
–एका इन्स्टाग्राम पोस्टचे विराट कोहलीला मिळतात एवढे कोटी, ऐकून व्हाल थक्क!
–या दोन खेळाडूंना वनडे संघात संधी न मिळाल्याने सौरव गांगुलीने व्यक्त केले आश्चर्य