या दोन खेळाडूंना वनडे संघात संधी न मिळाल्याने सौरव गांगुलीने व्यक्त केले आश्चर्य

भारतीय संघ पुढिल महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने होणार आहेत. या दौऱ्यासाठी निवड समीतीने रविवारी(21 जूलै) भारताचे टी20, वनडे आणि कसोटी संघ जाहिर केले आहेत.

यातील एकाही संघात मागील अनेक दिवसांपासून भारत अ संघाकडून चांगली कामगिरी करणाऱ्या शुबमन गिलला संधी देण्यात आलेली नाही. तसेच अजिंक्य रहाणेला फक्त कसोटी मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे.

त्यामुळे भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीने गिलला आणि रहाणेला वनडे संघात संधी न दिल्याबद्दल ट्विटरवरुन आश्चर्य व्यक्त केले आहे.

गांगुलीने दोन ट्विट केले आहेत. त्याने पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘आता वेळ आली आहे की भारतीय निवडकर्त्यांनी क्रिकेटच्या तीन्ही प्रकारासाठी सारखेच खेळाडू निवडले पाहिजे, ज्यामुळे ते लय आणि अत्मविश्वास मिळवू शकतात.’

‘खूप कमी खेळाडू आहेत जे तीन्ही प्रकारात खेळतात. महान संघात सातत्यपूर्ण खेळाडू असतात. सर्वांना आनंदी करण्याची ही गोष्ट नाही पण देशासाठी सर्वोत्तम खेळाडूची निवड करण्यात सातत्य राहिले पाहिजे.’

तसेच त्याने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘संघात असे अनेक खेळाडू आहेत जे सर्व प्रकारात खेळू शकतात. शुबमन गिल, रहाणेला वनडे संघात संधी न मिळाल्याचे आश्चर्य वाटले.’

गिलनेही त्याला या दौऱ्यासाठी एकाही संघात संधी न मिळाल्याने निराशा वाटल्याचे म्हटले होते. पण त्याचबरोबर तो यावर विचार करण्यात वेळ घालवणार नसल्याचेही त्याने म्हटले होते.

गिलने नुकत्याच पार पडलेल्या विंडीज अ संघाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतही भारत अ संघाकडून 3 अर्धशतकांसह 54.5 च्या सरासरीने 218 धावा केल्या आहेत. पण तो भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये असल्याचे भारताचे निवड समीती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी म्हटले आहे.

तसेच रहाणे मागील दिड वर्षापासून वनडे खेळलेला नाही. त्याने शेवटचा वनडे मागीलवर्षी फेब्रुवारीमध्ये खेळला होता. त्याने आत्तापर्यंत वनडेमध्ये 90 सामने खेळले असून 2962 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे.

विंडीज दौऱ्यासाठी असा आहे भारताचा संघ –

टी20 मालिका – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर , नवदीप सैनी.

वनडे मालिका – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

कसोटी मालिका – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताचा माजी कर्णधार म्हणतो, ‘…तर धोनी अजूनही खेळू शकतो क्रिकेट’

पंत, अय्यर, गिल सारख्या युवा खेळाडूंबद्दल कर्णधार विराट कोहली म्हणाला…

कसोटी क्रमवारीत विराट अव्वल स्थानी कायम, जाणून घ्या अन्य भारतीय खेळाडूंची क्रमावारी

You might also like

Leave A Reply