वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा घाट भारतात घातला जाणार आहे. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वी हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. त्यांच्यात 8 सप्टेंबरपासून 4 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडच्या कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स येथे खेळला जाणार आहे.
विशेष म्हणजे, ही मालिका इंग्लंड आणि न्यूझीलंड (England and New Zealand) दोन्ही बलाढ्य संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या संघांचे दोन दिग्गज खेळाडू पुनरागमन करत आहेत. एकीकडे बेन स्टोक्स याने वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेसाठी निवृत्तीतून माघार घेतली असून तो पुन्हा वनडे क्रिकेटमध्ये खेळणार आहे, तर दुसरीकडे, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याचेही संघात पुनरागमन झाले आहे. हे दोन्ही दिग्गज जवळपास एक वर्षानंतर खेळणार आहेत.
यापूर्वी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळली गेलेली 4 सामन्यांची टी20 मालिका 2-2ने बरोबरीत सुटली होती. मात्र, न्यूझीलंडचा आत्मविश्वास वाढला असेल. कारण, न्यूझीलंडने सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर दमदार पुनरागमन केले आहे. दुसरीकडे, इंग्लंडविषयी बोलायचं झालं, तर यावर्षीच्या अखेरीस भारतात खेळली जाणारी वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धा लक्षात घेऊन सर्व लक्ष स्टोक्सवर असेल, ज्याने नुकतेच पुनरागमन केले आहे.
इंग्लंड-न्यूझीलंडमध्ये काट्याची टक्कर
इंग्लंड-न्यूझीलंड (England-New Zealand) संघात आतापर्यंत 91 वनडे सामने खेळले गेले आहेत. यातील 41 सामन्यात इंग्लंडच्या पारड्यात विजय पडला आहे, तर 43 सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. दोन्ही संघांमधील 3 सामने बरोबरीत सुटले आहेत, तर 4 सामन्यांचा निकाल लागला नाही. अशात ही मालिका दोन्ही संघ एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतील.
भारतात कुठे पाहायची मालिका?
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामने टीव्हीवर सोनी नेटवर्क आणि मोबाईलवर सोनी लिव्ह ऍपवर पाहता येऊ शकतील.
कशी आहे इंग्लंडची खेळपट्टी?
कार्डिफच्या मैदानात 29 सामन्यातील सरासरी धावसंख्या ही 265 इतकी राहिली आहे. म्हणजेच, या मैदानावर मोठ्या धावसंख्येचा सामना पाहायला मिळू शकतो. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ आधी क्षेत्ररक्षण घेण्याचा विचार करू शकतो. (england vs new zealand 1st odi match trent boult and ben stokes return in team)
हेही वाचाच-
धोनीचा अमेरिकत जलवा! Donald Trump यांनी थेट गोल्फ खेळण्यासाठी बोलावले, व्हिडिओ पाहिला का?
शुबमनचे 24व्या वयात पदार्पण, करिअरमधील ‘या’ 5 विक्रमांमुळे ओळखला जातो टीम इंडियाचा ‘Prince’