इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट सध्याच्या युगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक आहे. तो विराट कोहली, केन विलियम्सन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यासह ‘फॅब फोर’मध्ये सहभागी आहे. या चौघांपैकी इतर तिन्ही फलंदाज सध्या खराब फॉर्ममध्ये आहेत, पण रुटचे धमाकेदार प्रदर्शन मात्र चालूच आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत त्याने नुकतेच सलग दोन शतके ठोकली आणि स्वतःच्या १०००० कसोटी धावा पूर्ण केल्या. त्याच्या या धडाकेबाज प्रदर्शनामागचा मोठा खुलासा रुटच्या वडिलांनी केला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जो रुट (Joe Root) सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यांच्या यादीत दिग्गज सुनील गावसकरांच्या पुढे गेला आहे. तो सध्या या यादीत १२ व्या स्थानावर आहे. रुटच्या वडिलांनी मुलाच्या या जबरदस्त फॉर्मचे कारण स्पष्ट केले आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे मोठा काळ खेळाडूंना क्रिकेट खेळता आले नाही. या दरम्यानच्या काळात जो रुट मात्र खेळपट्टीवरील स्वतःचे संतुलन सुधारण्यासाठी एका पायावर तास-न्-तास फलंदाजी करायचा.
रुटच्या वडिलांनी केला मोठा खुलासा
रुटचे वडील म्हणाले की, “कोविड १९ महामारीच्या काळात तो ‘रुट अकादमीत’ संतुलन बनवण्यासाठी एका पायावर तास-न्-तास फलंदाजी करायचा. तो अशा पद्धतीने सराव करतानाचा व्हिडिओ देखील आहे. जो रुटला फलंदाजी करायला आवडते. जेव्हा तो लहान होता, तेव्हा नेहमीच फलंदाजी करण्यासाठी तयार असायचा. त्याला फक्त गोलंदाजी करण्यासाठी कोणीतरी पाहिजे असायचं.”
दरम्यान, रुट १०,००० कसोटी धावा करणारा इंग्लंड संघाच्या इतिहासातील दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी माजी दिग्गज कर्णधार ऍलिस्टर कुकने ही कामगिरी केली होती. रुटने जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत १० कसोटी शतक आणि ४ अर्धशतके ठोकली आहेत. यादरम्यान, त्याने खेळलेल्या ४२ डावांमध्ये ५९ च्या सरासरीने २३६८ धावा केल्या आहेत. याच प्रदर्शनाच्या जोरावर तो ‘फॅब फोर’मध्ये सहभागी झाला. या चौघांमधील विराट कोहली, स्टीव स्मिथ आणि केन विलियम्सन यांनी मिळून जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत फक्त २ शतके केली आहे. पण एकट्या रूटने या काळात १० शतके ठोकली. रुट सध्या या तिघांवर भारी पडताना दिसत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पहिले पाढे पंचावन्न! कटकमध्ये पंतची जी चूक झाली, तिच विशाखापट्टणमध्येही झाली, पाहा व्हिडिओ
भारतरत्न! ‘हे’ ४ भारतीय खेळाडू होऊ शकतात देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित
कसोटी खेळतोय की टी२०!, इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोने केवळ ‘इतक्या’ चेंडून शतक ठोकत रचलाय विक्रम