---Advertisement---

पाकिस्तानचे इंग्लंडमध्ये विजयाचे स्वप्न राहिले अधुरे; दुसरा कसोटी सामना अनिर्णित

On: मंगळवार, ऑगस्ट 18, 2020 10:22 AM
---Advertisement---

मुंबई । इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेला दुसरा कसोटी सामना सोमवारी पावसामुळे अनिर्णित झाला. पावसामुळे शेवटच्या दिवशी जास्त वेळ खेळ होऊ शकला नाही. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसरा आणि अंतिम सामना शुक्रवारपासून सुरू होईल.

संपूर्ण सामन्यात फक्त 134.3 षटकांचा खेळ झाला. पावसामुळे तिसर्‍या दिवशी कोणताही खेळ झाला नव्हता आणि चौथ्या दिवशीही खेळ होऊ शकला नाही. पहिले दोन दिवस अपुऱ्या प्रकाशामुळे खेळात व्यत्यत येत होता. पाकिस्तानच्या संघाला वारंवार पाऊस आणि अंधूक प्रकाशाचा सामना करावा लागत होता. हे अडथळे पार करत संघाने 236 धावांपर्यंत मजल मारली.

तिसर्‍या दिवशी पाऊस पडल्यानंतर पाकिस्तानने चौथ्या दिवसाची सुरुवात नऊ बाद 223 धावांवरुन खेळण्यास सुरुवात  केली. पाकिस्तानने 5.2 षटकांत 13 धावांची भर घातली. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने मोहम्मद रिझवानला बाद करून पाकिस्तानचा डाव संपवला. पहिल्या डावात पाकिस्तानने 236 धावा केल्या होत्या.

इंग्लंडला मालिका जिंकण्याची संधी

शेवटच्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात एका बाद सात धावावरुन पुढे खेळत असताना 38.1 षटकांनंतर 4 बाद 110 धावा केल्या. दुसरा सामना अनिर्णित राहिल्यामुळे पाकिस्तानला मालिका जिंकण्याची आशा धूसर झाली आहे. आता तिसर्‍या कसोटीत संघ मालिकेत पराभव होण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडला ही मालिका जिंकण्यासाठी तिसरी कसोटी जिंकण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-वयाच्या चौथ्या वर्षापासूनचा एमएस धोनीचा खास मित्र म्हणाला, त्याने आम्हाला…

-निवृत्ती जाहीर करण्यापुर्वी एमएस धोनी करत होता ती गोष्ट ज्यावर त्याचे आहे जिवापाड प्रेम

-भारताला विश्वचषक जिंकून देणारा प्रशिक्षक म्हणतोय, ‘धोनी सोबत असेल, तर…’

ट्रेंडिंग लेख-

-विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 12 वर्षे पूर्ण…

-आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकवणारे ३ भारतीय क्रिकेटपटू

-आयपीएल २०२०: आरसीबीसाठी असे असू शकतात सलामी जोडीचे ३ पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---