मुंबई । एमएस धोनी क्रिकेट जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या सर्व ट्रॉफी आपल्या संघाला जिंकून दिल्या आहेत. त्याने शनिवारी (१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी भारतीय संघासोबतच्या कार्यकाळात धोनीने उत्तम आठवणी दिल्याबद्दल त्याचे आभार मानले आहेत.
कर्स्टन यांनी सोमवारी माजी कर्णधार एमएस धोनीचे कौतुक केले आणि म्हटले की, “ज्यांच्यासोबत काम केले त्यापैकी धोनी हा सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे.”
कर्स्टन हे प्रशिक्षक असताना भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वात 2011 मध्ये विश्वचषक जिंकला होता. 52 वर्षीय कर्स्टन हे 2008 ते 2011 या काळात भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.
कर्स्टन यांची प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबरोबर तीन वर्षानंतर 2011 मध्ये भारत विश्वविजेता बनला. यापूर्वी भारतीय संघाने 2010 मध्ये आशिया चषक जिंकला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या या माजी खेळाडूने ट्विटरवर लिहिले की, “मला एका सर्वोत्कृष्ट कर्णधाराबरोबर काम करण्याचा अनुभव मिळाला. भारतीय क्रिकेट संघासह मला अनेक अद्भुत आठवणी दिल्याबद्दल एमएस धोनीचे आभार.”
https://twitter.com/Gary_Kirsten/status/1295217349629554691
कर्स्टन यांनी त्यावेळी धोनीशी घनिष्ट नातेसंबंध निर्माण केले होते. सोमवारी त्यांनी जुन्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला, ज्यात हे दोघे एकमेकांच्या जवळ असल्याचे दिसून येते. ते म्हणाले की, “जर माझ्यासमवेत धोनी असेल, तर मला युद्धामध्ये जाण्यास काहीच अडचण येणार नाही.”
शनिवारी धोनीने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तरीही तो 19 सप्टेंबरपासून सुरू होणार्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळणार आहे. धोनीबरोबरच सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘धोनीने बदलला होता भारतीय क्रिकेटचा चेहरा,’ माजी पाकिस्तानी क्रिकेटरने केली धोनीची प्रशंसा
-‘ती’ गोष्ट मात्र धोनीला टी२० क्रिकेटमध्ये कधीच मिळवता आली नाही; राहील नेहमीच खंत
-‘देशाचा रत्न’ एमएस धोनीला मिळायला हवा ‘भारतरत्न’ पुरस्कार, पहा कोणी केली मागणी
ट्रेंडिंग लेख-
-या ३ विदेशी खेळाडूंची उणीव जाणवणार यावर्षी आयपीएलमध्ये
-कोरोनामुळे निधन झालेल्या भारताच्या पहिल्या ‘वॉल’ बद्दल फारशा माहिती नसलेल्या १० गोष्टी
-लॉकडाऊनमध्ये ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना मिळाल्या त्यांच्या जीवनसंगिनी