काही दिवसांपुर्वी १९ सप्टेंबरपासून युएईत सुरु होणाऱ्या आयपीएल २०२० च्या तयारीसाठी एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या सराव शिबिरात सहभागी झाला आहे. अशा परिस्थितीत शनिवारी (१५ ऑगस्ट) धोनीने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना चकित केले.
एकीकडे सर्वजण धोनीला त्याच्या शानदार कारकिर्दीबद्दल अभिनंदनपर शुभेच्छा देत आहेत. तर, काहींनी धोनीला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. मध्य प्रदेशचे आमदार आणि कॉंग्रेसचे माजी मंत्री पीसी शर्मा यांनी धोनीला भारतरत्न पुरस्कार देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. MS Dhoni Should Be Honored By Bharat Ratna Award
शर्मा यांनी काल (रविवारी) केंद्र सरकारकडे या गोष्टीची मागणी केली आहे. यावेळी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत शर्मा यांनी लिहिले की, “भारतीय क्रिकेटला जगभरात विजेता म्हणून प्रस्थापित करणारा ‘देशाचा रत्न’ एमएस धोनीला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जावे.”
भारतीय क्रिकेट को पूरी दुनिया में विजेता के रूप में स्थापित करने वाले "देश के रत्न" महान कप्तान महेंद्र सिंह धोनी को भारत-रत्न से सम्मानित किया जाना चाहिये। @msdhoni @PMOIndia #pcsharmainc #MSDhoni
— P. C. Sharma (@pcsharmainc) August 16, 2020
याविषयी बोलताना शर्मा म्हणाले की, “धोनी क्रिकेटचा भारतरत्न आहे. त्याने भारतीय क्रिकेटला यशाच्या ऊंचीवर नेले आहे. म्हणून त्याला भारतरत्नाने सन्मानित करण्यात यावे. भारतरत्न हा भारतातील सर्वोत्कृष्ट नागरीक सन्मान आहे. हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो. या सेवांमध्ये कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रिडा यांचा समावेश होतो.”
धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. यात २००७ सालचा टी२० विश्वचषक, २०११ सालचा वनडे विश्वचषक आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी यांचा समावेश होतो.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीचा पहिला कर्णधार सौरव गांगुलीने केली भावनिक पोस्ट; म्हणाला, ‘प्रत्येक चांगली गोष्ट…’
‘फिनिशर’ धोनीने वनडेत केला आहे असा कारनामा, जो कोणाच करता आला नाही
धोनीच्या निवृत्तीनंतर रिषभ पंतचे वाढले टेंशन; जाणून घ्या काय आहे कारण
ट्रेंडिंग लेख –
कोरोनामुळे निधन झालेल्या भारताच्या पहिल्या ‘वॉल’ बद्दल फारशा माहिती नसलेल्या १० गोष्टी
लॉकडाऊनमध्ये ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना मिळाल्या त्यांच्या जीवनसंगिनी
धोनी- रैनाप्रमाणे फेअरवेलची मॅच न खेळताच क्रिकेटला राम राम ठोकणारे ५ भारतीय दिग्गज