शनिवारी (१५ ऑगस्ट) एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनीची क्रिकेट कारकिर्द शानदार राहिली आहे. त्याने आजवर दमदार कामगिरी करत एकापेक्षा एक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. पण, विक्रमांचा रतीब घालणाऱ्या धोनीला टी२० क्रिकेटमधील एक विक्रम मात्र करता आला नाही.
क्रिकेटच्या सामन्यात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार देण्यात येतो. तर, पूर्ण मालिकेतील खेळाडूच्या कामगिरीवरुन त्याला मालिकावीर पुरस्कार दिला जातो. धोनीने त्याच्या वनडे कारकिर्दीत २१ वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. पण, आश्चर्याची गोष्ट ही आहे की, आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये धोनी एकदाही सामनावीर आणि मालिकावीर बनला नाही. त्याला फक्त त्याच्या फलंदाजी कामगिरीसाठी नव्हे तर यष्टारक्षणासाठीही टी२० क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार मिळवता आला नाही.
एवढेच नाही तर, आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत, धोनी रोहित शर्माबरोबर संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. दोघांनीही आयपीएलमध्ये सर्वाधिक १७-१७ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.
उजव्या हाताचा फलंदाज धोनीने ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ८५ डावात फलंदाजी करताना ४२वेळा नाबाद राहत १६१७ धावा केल्या आहेत. धोनीची टी२०मधील फलंदाजी सरासरी ३७.६ इतकी आहे, तर त्याचा स्ट्राईक रेट १२६.१३ इतका आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकारात (टी२० क्रिकेट) २ अर्धशतकेही लगावली आहेत. तरीही त्याला एकाही आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवता आला नाही.
२००७ ला आपल्या नेतृत्त्वाखाली भारताला टी२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीने ७२ टी२० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व केले आहे. त्यापैकी त्याने ४१ सामने जिंकले आहेत, तर २८ पराभूत झाले आहेत. उर्वरित २ सामने अनिर्णीत आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे त्याची टी२० क्रिकेटमधील विजय सरासरी ५९.२८ इतकी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘देशाचा रत्न’ एमएस धोनीला मिळायला हवा ‘भारतरत्न’ पुरस्कार, पहा कोणी केली मागणी
धोनीच्या निवृत्तीनंतर युवराज म्हणतोय, ‘युही चला चल माही’
एमएस धोनीला खेळायला मिळणार नाही फेअरवेल मॅच; पहा कोण म्हणतंय
ट्रेंडिंग लेख –
धोनी- रैनाप्रमाणे फेअरवेलची मॅच न खेळताच क्रिकेटला राम राम ठोकणारे ५ भारतीय दिग्गज
कोरोनामुळे निधन झालेल्या भारताच्या पहिल्या ‘वॉल’ बद्दल फारशा माहिती नसलेल्या १० गोष्टी