---Advertisement---

पाकिस्तानला नमविण्यासाठी इंग्लंड घेणार पाकिस्तानी अष्टपैलूची मदत; कोचिंग स्टाफमध्ये केले सामील

On: गुरूवार, ऑगस्ट 20, 2020 11:16 AM
---Advertisement---

मुंबई । 28 ऑगस्टपासून इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन टी20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. त्यासाठी इंग्लंडने पाकिस्तानचे माजी अष्टपैलू अजहर मेहमूद यांचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश केला आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) मंगळवारी सांगितले की, ’45 वर्षीय महमूद जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार्‍या टी -20 मालिकेत, इंग्लंडचे गोलंदाजी प्रशिक्षक जॉन लुईस यांची मदत करतील.’

ब्रिटिश नागरिकत्व मिळवलेले अझर महमूद हे गेल्या वर्षापर्यंत मिकी आर्थरच्या मुख्य प्रशिक्षक असलेल्या पाकिस्तानच्या कोचिंग स्टाफचा एक भाग होते. महमूद यांनी पाकिस्तानकडून 21 कसोटी सामन्यांत 39 विकेट्स घेतल्या असून 900 ​​धावाही केल्या आहेत. 143 वनडे सामन्यात 123 बळी घेण्याबरोबरच त्यांनी 1521 धावाही केल्या आहेत.

इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक ग्रॅहम थॉर्प हे तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत ख्रिस सिल्व्हरवुडच्या जागी मुख्य प्रशिक्षकपदी असतील. त्यांना सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड सहाय्य करतील. मार्कस ट्रेस्कॉटिकला फलंदाजी प्रशिक्षक तर एसेक्सचा माजी यष्टीरक्षक जेम्स फॉस्टर याला या मालिकेसाठी यष्टीरक्षक प्रशिक्षकाची भूमिका देण्यात आली आहे.

दरम्यान, इंग्लंडने या मालिकेसाठी ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील 14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आयर्लंडविरुद्ध खराब कामगिरी करणार्‍या जेम्स व्हिन्सच्या जागी डेव्हिड मलानचा संघात समावेश करण्यात आला असून मालिकेचा दुसरा व तिसरा टी 20 अनुक्रमे 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.

तसेच सध्या पाकिस्तानविरुद्ध खेळत असलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंड 1-0ने पुढे आहे. पहिला कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला गेला, त्यात इंग्लंडने पाकिस्तानला तीन गडी राखून पराभूत केले. त्याच वेळी, दुसरा सामना साऊथॅम्प्टन येथे खेळविण्यात आला, जो अनिर्णित झाला. दुसर्‍या कसोटीत केवळ 134.3 षटकांचा खेळ झाला. पाऊस पडल्याने आणि कमी प्रकाशामुळे या सामन्यातील खूप वेळ वाया गेला. या मालिकेचा तिसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (21 ऑगस्ट) साऊथॅम्प्टनच्या एजेस् बॉउल येथे खेळला जाईल.

पाकिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ –

ओएन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), टॉम बॅंटन, सॅम बिलिंग्ज, टॉम करन, जो डेले, लुईस ग्रेगरी, ख्रिस जॉर्डन, साकीब मेहमूद, डेव्हिड मालन, आदिल रशीद, जेसन रॉय, डेव्हिड विले.

राखीव खेळाडूः प्रॅट ब्राऊन, लियाम लिव्हिंगस्टोन, रीस टॉप्ले

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---