आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सोमवारी (१ नोव्हेंबर) श्रीलंका विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. इंग्लंड संघाने आतापर्यंत या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. तर श्रीलंका संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण गेल्या २ सामन्यात श्रीलंका संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तत्पूर्वी कशी राहिली आहे या दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी? चला जाणून घेऊया.
ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या इंग्लंड संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात इंग्लंड संघाने जोरदार विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. त्यामुळे इंग्लंड संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार यात काही शंका नाही. परंतु श्रीलंका संघाने सुपर-१२ फेरीतील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर पुढील २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जर इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात श्रीलंका संघाला विजय मिळवण्यात अपयश आले. तर श्रीलंका संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करता येणार नाही.
इंग्लंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ सुपर-१२ फेरीतील आपला चौथा सामना खेळणार आहेत. इंग्लंड संघाने सुरुवातीच्या ३ सामन्यात वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले होते. तर श्रीलंका संघाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाला पराभूत केले होते. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात श्रीलंका संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हे दोन्ही संघ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३ व्या वेळेस आमने सामने येणार आहेत. यापूर्वी झालेल्या १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८ वेळेस इंग्लंड संघाने बाजी मारली आहे. तर ४ वेळेस श्रीलंका संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तसेच यूएईच्या खेळपट्टीवर हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर बुमराह झाला व्यक्त; म्हणाला, ‘६ महिने सतत क्रिकेट, आम्हालाही…’
न्यूझीलंडविरुद्ध सूर्यकुमार यादवला का ठेवले गेले प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर? कारण आहे चिंताजनक
भारतीय संघाचे ‘तारे जमीन पर’, संतप्त चाहत्यांनी विराट आणि संघासहित मेन्टॉर धोनीवर काढली भडास