वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला असून पाहुण्या इंग्लंडच्या संघाने ८९.४ षटकांमध्ये २०४ धावा केल्या आहेत. या डावात इंग्लंडच्या खालच्या फळीतील फलंदाज जॅक लीच आणि शाकिब महमूद यांनी शेवटच्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या २०० पार नेली आहे.
जेव्हा महमूद (Saqib Mahmood) लीचची (Jack Leach) साथ देण्यासाठी खेळपट्टीवर आला होता, तेव्हा इंग्लंडचा संघ ९ बाद ११४ धावा अशा स्थितीत होता. मात्र त्यानंतर लीच आणि महमूदने मिळून ३६.२ षटके फलंदाजी केली आणि इंग्लंडला कमी धावसंख्येवर बाद होण्यापासून (90 Runs Partnership For 10th Wicket) वाचवले. या डावात इंग्लंडकडून दुसरी सर्वश्रेष्ट भागीदारी नवव्या विकेटसाठी झाली असून यामध्ये दोन्ही फलंदाजांनी मिळून २४ धावा केल्या.
लीच आणि महमूद यांच्या भागीदारीमुळे इंग्लंडच्या संघाची लाज वाचली. विशेष म्हणजे, हा महमूदचा दुसराच कसोटी सामना होता. तर कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. या डावात त्याने ११८ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ४९ धावा जोडल्या आहेत. तर लीचने ५ चौकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या आहेत.
From 1⃣1⃣4⃣-9⃣ to 2⃣0⃣4⃣ all out…
Incredible work for the team 👏
Match Centre: https://t.co/7ZZAhn1zxv
🏝 #WIvENG 🏴 pic.twitter.com/2W89UD6oOm
— England Cricket (@englandcricket) March 24, 2022
२ चेंडू बाकी असतानाच गेली दहावी विकेट
कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेल संपण्यासाठी केवळ २ चेंडू बाकी असताना इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला. वेस्ट इंडिजच्या जरमाइन ब्लॅकवूड याने महमूदला त्रिफळाचीत करत इंग्लंडची दहावी विकेट घेतली.
इंग्लंडची फलंदाजी फळी सपशेल फेल
दरम्यान इंग्लंडच्या पहिल्या डावातील फलंदाजी प्रदर्शनावर नजर टाकायची झाल्यास, या डावात लीच आणि मदमूदव्यतिरिक्त केवळ ३ फलंदाजांना दुहेरी धावा करता आल्या. यात सलामीवीर ऍलेक्स लीस, ख्रिस वोक्स आणि क्रेग ओव्हरटन यांचा समावेश आहे. ऍलेक्सने ३१ धावा, वोक्सने २५ धावा आणि ओव्हरटनने १४ धावांची खेळी केली होती. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याच्यासह इतर ६ फलंदाज एकेरी धावेवरच बाद झाले होते.
या डावात वेस्ट इंडिजकडून जेडन सिल्स याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच केमार रोच, कायले मेयर्स आणि अल्जारी जोसेफ यांनीही प्रत्येकी २ विकेट्सचे योगदान दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘अपराजित’ ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक, बांंगलादेशला ५ विकेट्सने नमवत केला विजयी शेवट
‘विराटने कर्णधारपद सोडून समजूतदारपणा दाखवला, पण…’, रवी शास्त्रींनी व्यक्त केल्या भावना