इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यामध्ये पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं वेस्ट इंडिजला पराभूत करुन 1-0 अशी आघाडी घेतली होती. तर सलग दुसरा सामना देखील इंग्लंडनं जिंकला. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दुसरा कसोटी सामना ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम येथे खेळला गेला. या सामन्यात एक अप्रतिम नजारा पाहायला मिळाला. या सामन्यात स्टेडियममध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा ‘लूकलाईक’ दिसला.
इंग्लंड क्रिकेटच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये बेन स्टोक्ससारखाच दुसरा चेहरा मैदानात पाहायला मिळाला. ज्याला पाहून इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) देखील आश्चर्यचकित झाला. स्टोक्सनं त्याच्यासारखा दुसरा चेहरा मैदानात पाहून मनोरंजक प्रतिक्रिया दिली. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, “एका बेन स्टोक्सपेक्षा एकच गोष्ट चांगली आहे…दोन बेन स्टोक्स.”
There’s only one thing better than one Ben Stokes… Two Ben Stokes. 👨🦰👨🦰 pic.twitter.com/SGV941zDew
— England Cricket (@englandcricket) July 21, 2024
इंग्लंडनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 241 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात इंग्लंडनं 416 धावा ठोकल्या. त्यामध्ये ओली पोपनं सर्वाधिक (Olli Pope) 121 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्यानं 15 चौकारांसह 1 षटकार लगावला. तर बेन डकेट आणि कर्णधार बेन स्टोक्सनं (Ben Stokes) अर्धशतकी खेळी खेळली. त्यानंतर वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात 457 धावा केल्या.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात त्यांनी 425 केल्या. त्यामध्ये रुटनं इंग्लंडसाठी 122 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या खेळीत त्यानं 10 चौकार लगावले आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीमधील 32व्या शतकाला गवसणी घातली. तर हॅरी ब्रूकनं देखील दुसऱ्या डावात 109 धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर ओली पोप आणि बेन डकेट यांनी इंग्लंडसाठी अर्धशतकी खेळी खेळून संघाला 425 धावांपर्यंत पोहोचवले.
इंग्लडनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघ अवघ्या 143 धावांवरतीच सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजसाठी कोणताच फलंदाज अर्धशतकी खेळी देखील करु शकला नाही. इंग्लंडनं या मोठ्या विजयासह 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार ओली पोपला (Ollie Pope) देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 आशिया चषकात शतक ठोकणारी पहिली महिला क्रिकेटपटू, दिग्गज मिताली राजचा विक्रम मोडला
गिल-यशस्वी ओपनिंग, रिंकू-दुबे फिनिशिंग; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 ची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळली जाणार टी20 मालिका?