इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. त्यामध्ये इंग्लडचा दिग्गज फलंदाज जो रुटनं (Joe Root) वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शानदार शतक झळकावलं. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे त्याचं 32वं शतक आहे. 32व्या शतकाला गवसणी घालून रुटनं स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), केन विल्यमसन (Kane Williamson) आणि स्टीव्ह वॉ ( Steve Waugh) यांची बरोबरी केली आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात जो रुटनं (Joe Root) 122 धावांची शानदार शतकी खेळी केली. त्यानं आपल्या खेळीत 10 चौकार मारले. या शतकासह रुटनं कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यांची बरोबरी केली आहे. विल्यमसन आणि स्मिथनं कसोटी क्रिकेटमध्ये 32 शतके झळकावली आहेत. आता तिन्ही फलंदाजांच्या नावावर 32 शतके झाली आहेत.
भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) देखील जो रुटनं मागे टाकले आहे. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये जो रुट, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन आणि विराट कोहली यांची सर्वाधिक शतकं आहेत. परंतू रुट, स्मिथ, विल्यमसन यांची 32-32 शतकं आहेत. तर कोहलीची मात्र 29 शतकं आहेत.
जो रुटनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये आतापर्यंत 141 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 260 डावात त्यानं 11,926 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्यानं 62 अर्धशतकांसह 32 शतकं झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 254 आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर 51, जॅक कॅलिस 45, रिकी पाँटिंग 41, कुमार संगकारा 38, राहुल द्रविड 36, युनूस खान 36, सुनील गावस्कर 36, ब्रायन लारा 34, महेला जयवर्धने 34, ॲलेस्टर कुक 33, केन विल्यमसन 32, स्टीव्ह स्मिथ 32, जो रुट 32, स्टीव्ह वॉ 32
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाबद्दल आकाश चोप्रानं दिली प्रतिक्रिया
पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! भारतीय खेळाडूंसाठी मदतीची घोषणा
माहीच्या निवृत्तीबद्दल मोहम्मद शमीनं केलं वक्तव्य! म्हणाला, “धोनीच्या भविष्यावर…”