क्रिकेटविश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो वडील बनला आहे. दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या बेअरस्टोच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. विशेष म्हणजे, ऍशेज मालिकेपूर्वीच बेअरस्टो बापमाणूस बनला आहे. ही आनंदाची बातमी बेअरस्टोने स्वत: चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
बुधवारी (दि. 7 जून) जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत वडील बनल्याची आनंदाची बातमी शेअर केली. विशेष म्हणजे, यावेळी त्याने मुलाच्या नावाचाही खुलासा केला. बेअरस्टोने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “मला तुमच्यासोबत ही आनंदाची बातमी शेअर करताना खूपच आनंद होत आहे की, मी आणि माझी गर्लफ्रेंड एडवर्ड बेअरस्टो याचे आई-वडील बनलो आहोत. येणारा काळ किती अद्भूत असणार आहे.”
आई-मुलगा दोघेही ठीक
इंग्लंडच्या या स्टार खेळाडूने हेदेखील सांगितले की, त्याची गर्लफ्रेंड आणि मुलगा एडवर्ड (Edward Bairstow) दोघेही ठीक आहेत. फोटोत स्पष्ट दिसते की, बेअरस्टो त्याच्या मुलाला प्रेमाने फेरफटका मारण्यासाठी घेऊन गेला आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 16 जूनपासून होणाऱ्या ऍशेज मालिका 2023पूर्वीच बेअरस्टोसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

ऍशेज मालिकेसाठी मिळाली जागा
बेअरस्टो दुखापतीमुळे दीर्घ काळ क्रिकेटपासून दूर होता. मात्र, तो आता पूर्णपणे फिट आहे. ऍशेज मालिका 2023साठी त्याला संघात निवडले गेले आहे. तो बॅटमधून धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, तो दीर्घ काळानंतर मैदानावर परतून ऍशेज मालिकेत काय कमाल करतो.
ऍशेजच्या सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, जॅक क्राऊले, बेन डकेट, डॅन लॉरेंस, ओली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जोश टंग, ख्रिस वोक्स, मार्क वूड, मोईन अली (england wicket keeper batsman johnny bairstow became father before ashes series 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितने रिव्ह्यूची उडवली खिल्ली, पंचांना गोंधळात टाकण्यासाठी केले ‘हे’ कृत्य; लगेच पाहा
Video : सब्स्टिट्यूट म्हणून आला अन् स्टार्कला तंबूत पाठवून गेला, पाहा अक्षर पटेलचा रॉकेट थ्रो






