साउथॅंप्टन | भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
हा सामना रोझ बोल स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने या सामन्यासाठी संघात एकही बदल केला नाही.
विराट कोहलीने कर्णधारपदी निवड झाल्यापासून प्रथमच सलग दोन सामन्यात एकही बदल न करता खेळत आहे.
भारतीय संघ या मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे. मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय संघ पराभूत झाला आहे. तर संघाने तिसरा सामना जिंकत भारताने मालिकेत जबरदस्त कमबॅक केले आहे.
असा आहे भारतीय संघ- विराट कोहली(कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन,जसप्रित बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी
IND XI: L Rahul, S Dhawan, C Pujara, V Kohli, A Rahane, H Pandya, R Pant, R Ashwin, M Shami, I Sharma, J Bumrah
— BCCI (@BCCI) August 30, 2018
ENG XI: A Cook, K Jennings, J Root, J Bairstow, J Buttler, B Stokes, M Ali, S Curran, A Rashid, S Broad, J Anderson
— BCCI (@BCCI) August 30, 2018