शुक्रवार (दि. 27 जानेवारी) हा दिवस क्रिकेट विश्वासाठी खूपच महत्त्वाचा होता. खासकरून महिला क्रिकेटसाठी. या दिवशी 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषकातील दोन उपांत्य सामने खेळवले गेले. यातील पहिला उपांत्य सामना भारतीय महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात पार पडला. त्यात भारतीय महिला संघाने 8 विकेट्सने विजय मिळवत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. तसेच, दुसरा उपांत्य सामना इंग्लंड महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. या सामन्यात इंग्लंड महिला संघाने 3 धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता इंंग्लंड महिला विरुद्ध भारतीय महिला असा अंतिम सामना रंगणार आहे.
सेनवेस पार्क येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला (England Women vs Australia Women) संघात सामना रंगला होता. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी इंग्लंडने फलंदाजी करताना 19.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 99 धावा केल्या होत्या. या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाला अपयश आले. त्यांना इंग्लंड संघाने 18.4 षटकात सर्वबाद करत 96 धावांवरच रोखले. त्यामुळे इंग्लंडने हा सामना 3 धावांनी नावावर केला.
Extraordinary scenes at the #U19T20WorldCup 🤯
An astonishing semi-final goes in England’s favour!
📝 Full Scorecard: https://t.co/nYsYeiTBBp pic.twitter.com/oi5TbECRxv
— ICC (@ICC) January 27, 2023
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना ऍमी स्मिथ (Amy Smith) हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 26 चेंडूत 26 धावांचे योगदान दिले. यामध्ये 3 चौकारांचा समावेश होता. तिच्याव्यतिरिक्त क्लेअर मूरे (20) आणि एला हेवर्ड (16) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. इतर एकाही फलंदाजाने खास कामगिरी केली नाही. तीन फलंदाज शून्य धावेवर तंबूत परतले.
यावेळी इंग्लंडकडून फलंदाजी करताना हॅना बेकर (Hannah Baker) हिने सर्वाधिक विकेट्स नावावर केल्या. तिने 4 षटके गोलंदाजी करताना फक्त 10 धावा देत 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तिच्याव्यतिरिक्त कर्णधार ग्रेस स्क्रीव्हेन्स हिनेदेखील 2 विकेट्स घेतल्या. तसेच, एली अँडरसन, ऍलेक्सा स्टोनहाऊस, जोसी ग्रोव्हज आणि रायना गे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडकडून ऍलेक्सा स्टोनहाऊस हिने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. तिने 33 चेंडूत 25 धावा केल्या. यामध्ये 2 चौकारांचा समावेश होता. तिच्याव्यतिरिक्त कर्णधार ग्रेस स्क्रीव्हेन्स (20), जोसी ग्रोव्हज (15) आणि सेरेन स्मेल (10) यांनी 2 आकडी धावसंख्या केल्या. इतर फलंदाज 5 धावांचा आकडाही पार करू शकल्या नाहीत.
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना एक-दोन नाही, तर तब्बल 3 गोलंदाजांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. त्यात मॅगी क्लार्क, एला हेवर्ड आणि सिएना जिंजर यांचा समावेश आहे. त्यांच्याव्यतिरिक्त मिली इलिंगवर्थ हिनेदेखील एक विकेट नावावर केली.
आता इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला संघात अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघ रविवारी (दि. 29 जानेवारी) आमने-सामने असतील. हा सामनादेखील सेनवेस पार्क (Senwes Park) येथे खेळला जाणार आहे. (England Women Won by 3 runs Against Australia Women In U19 Womens t20 World Cup 2023 2nd Semi Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारतीय महिलांचा विश्वचषकात दबदबा, न्यूझीलंडला नमवत मिळवले फायनलचे तिकीट
चुकलास गड्या! संधीचं सोनं करण्यात राहुल त्रिपाठी अपयशी, नावावर नकोशा विक्रमाची नोंद