Loading...

रोमांचकारी झालेल्या तिसऱ्या ऍशेस सामन्यात इंग्लंडचा १ विकेटने विजय

लीड्स। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात हेडिंग्ले, लीड्स येथे पार पडलेल्या तिसऱ्या ऍशेस कसोटी सामन्यात इंग्लंडने 1 विकेटने विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच इंग्लंडने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मिळवलेल्या 112 धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने दुसऱ्या डावात 125.5 षटकात 9 विकेट्स गमावत पूर्ण केला.

इंग्लडकडून या विजयात बेन स्टोक्सने नाबाद 135 धावांची शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 8 षटकार मारले. विशेष म्हणजे त्याने शेवटच्या विकेटसाठी जॅक लीचबरोबर महत्त्वपूर्ण नाबाद 76 धावांची भागीदारीही रचली आणि इंग्लंडला विजय साकारुन दिला.

स्टोक्सबरोबरच इंग्लंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटने 77 धावांची तर जो डेन्लीने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र अन्य फलंदाजांकडून साजेशी कामगिरी झाली नाही. ऑस्ट्रेलियाकडून जॉस हेजलवूडने दुसऱ्या डावात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सर्वबाद 246 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून मार्नस लॅब्यूशानेने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. तसेच इंग्लंडकडून या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

Loading...

तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 179 धावा केल्या होत्या. पहिल्या डावातही ऑस्ट्रेलियाकडून लॅब्यूशानेने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने 61 धावांची खेळी केली. या डावात इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या.

त्याचबरोबर इंग्लंडला मात्र पहिल्या डावात केवळ 67 धावा करता आल्या होत्या. त्यांच्याकडून केवळ जो डेन्लीला दोन आकडी धावसंख्या पार करता आली होती. डेन्लीने 12 धावा केल्या होत्या. तसेच ऑस्ट्रेलियाकडून या डावात हेजलवूडनेच सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक: 

ऑस्ट्रेलिया पहिला डाव – सर्वबाद 179 धावा

Loading...

इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 67 धावा

ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – सर्वबाद 246 धावा

इंग्लंड दुसरा डाव – 9 बाद 362 धावा

सामनावीर – बेन स्टोक्स (पहिला डाव – 8 धावा आणि 1 विकेट, दुसरा डाव – नाबाद 135 धावा आणि 3 विकेट)

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून पीव्ही सिंधूने ऐतिहासिक सुवर्णपदक केले आईला समर्पित

किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विनसाठी ही आहे सर्वात वाईट बातमी!

बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूने सुवर्णपदक जिंकत रचला इतिहास

Loading...
You might also like
Loading...