fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूने सुवर्णपदक जिंकत रचला इतिहास

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आज(25 ऑगस्ट) बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2019मध्ये महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले आहे.

बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.

तिने ओकुहराला 21-7, 21-7 अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभूत केले आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.

सिंधूचे हे बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधील एकूण 5 वे पदक ठरले आहे. तिने याआधी या स्पर्धेत 2017 आणि 2018 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण तिला दोन्हीवेळेस अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तसेच 2013 आणि 2014 मध्ये तिला या स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते.

आज 38 मिनिटे पार पडलेल्या अंतिम सामन्यात सिंधूने शानदार सुरुवात केली होती. तिने पहिल्या सेटमध्ये पहिला पॉइंट गमावल्यानंतर सलग 8 पॉइंट मिळवत 8-1 अशी आघाडी घेतली.

तिने ही आघाडी पहिल्या सेटच्या मध्यंतरापर्यंत 11-2 अशी राखली. यानंतरही तिने तिचा आक्रमक खेळ कायम ठेवत ओकुहारावर पूर्णपणे वर्चस्व ठेवले. तिने पहिला सेट 21-7 असा सहज जिंकला.

यानंतर दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने ओकुहाराला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. तिने दुसऱ्या सेटच्या मध्यंतरापर्यंत 11-4 अशी आघाडी घेतली. यानंतर ओकुहाराला सिंधूविरुद्ध केवळ 3 पॉइंट्स मिळवता आले. त्यामुळे सिंधूने हा सेटही 21-7 अशा जिंकत सामनाही जिंकला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियनशीप: साईप्रणीतला कांस्यपदक; उपांत्यफेरीत बसला पराभवाचा धक्का

विंडीज विरुद्ध तिसऱ्या दिवशी काळी पट्टी बांधून मैदानात उतरला भारतीय संघ, जाणून घ्या कारण

 

You might also like