इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील बर्मिंघमच्या ऍजबस्टन मैदानावर झालेला पाचवा व अखेरचा सामना यजमानांनी ७ विकेट्स राखून जिंकला. शेवटच्या डावात विजयासाठी मिळालेले ३७८ धावांचे आव्हान षटकात गाठत इंग्लंडने सामना खिशात घातला आहे. यासह ५ सामन्यांची ही कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत सुटली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४१६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २८४ धावांवरच गारद झाला आणि पहिल्या डावात भारताकडे १३२ धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघ २४५ धावांवर गुंडाळला गेला. परिणामी इंग्लंडला चौथ्या व अखेरच्या डावात विजयासाठी २७८ धावांचे आव्हान मिळाले. सलामीवीरांच्या शतकी भागीदारीनंतर जो रूट आणि जॉनी बेयरस्टो यांनी आपापली वैयक्तिक शतके पूर्ण करत संघाला सोपा विजय मिळवून दिला.
रिषभ पंत-रविंद्र जडेजाच्या खेळी व्यर्थ
पहिल्या डावात भारताकडून रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांनी झंझावाती शतकी खेळी केल्या. पंतने १११ चेंडू खेळताना ४ षटकार आणि २० चौकारांच्या मदतीने १४६ धावांची खेळी केली. तसेच अष्टपैलू जडेजानेही १९४ चेंडूत १०४ धावांचे योगदान दिले. या खेळीदरम्यान त्याने १३ चौकारही मारले होते. या दोघांच्या शतकी खेळींच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ८४.५ षटकात ४१६ धावा फलकावर लावल्या होत्या.
England win 🎉#WTC23 | #ENGvIND | https://t.co/wMZK8kf03b pic.twitter.com/fLyKbOtPkh
— ICC (@ICC) July 5, 2022
या डावात इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच मॅथ्यू पॉट्सने २ फलंदाजांना बाद केले होते. याखेरीज स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स आणि जो रूट यांनीही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले.
इंग्लंडकडून बेयरस्टोची एकाकी झुंज
भारताच्या पहिल्या डावातील ४१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेयरस्टोने एकट्याने एकाकी झुंज दिली होती. इतर फलंदाज साध्या ४० धावांचा आकडाही पार करू शकले नव्हते. मात्र बेयरस्टोने १४० चेंडू खेळताना २ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने १०६ धावांची चिवट झुंज दिली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडचा संघ २८४ धावांपर्यंत जमल मारू शकला होता. या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच जसप्रीत बुमराह (०३ विकेट्स), मोहम्मद शमी (०२ विकेट्स) आणि शार्दुल ठाकूर (०१ विकेट) यांनीही काही विकेट्स काढल्या होत्या.
पुजारा आणि पंत सोडून सगळे फेल
दुसऱ्या डावात मात्र भारताकडून कोणत्याही फलंदाजाला मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. चेतेश्वर पुजारा १६८ चेंडू खेळल्यानंतर ६६ धावांवर बाद झाला. रिषभ पंतनेही ८६ चेंडूंचा सामना करताना ५७ धावांची खेळी केली आणि भारतीय संघ २४५ धावांवरच गुंडाळला गेला. या डावात इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ४ फलंदाजांना तंबूत धाडले होते. तसेच स्टुअर्ट ब्रॉड, मॅथ्यू पॉट्स यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या होत्या.
England win the Edgbaston Test by 7 wickets.
A spirited performance by #TeamIndia as the series ends at 2-2. #ENGvIND pic.twitter.com/fNiAfZbSUN
— BCCI (@BCCI) July 5, 2022
बेयरस्टो-रूट जोडीची कमाल
भारताकडून मिळालेल्या ३७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर ऍलेक्स लीस आणि झॅक क्राउले यांनी शतकी भागीदारी करत संघासाठी विजय सोपा बनवला होता. लीसने ६५ चेंडूत ५६ तर क्राउलेने ७६ चंडूत ४६ धावांची खेळी केली होती. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी झाली होती. त्यानंतर जॉनी बेयरस्टो आणि जो रूट यांनी संघाचा मोर्चा सांभाळला. चौथ्या दिवशी खिंड लढवल्यानंतर पाचव्या दिवशी पहिल्या सेशनपर्यंतच त्यांनी संघाला विजय मिळवून दिला. रूट १७३ चेंडूत १ षटकार आणि १९ चौकारांच्या मदतीने १४२ धावांवर नाबाद राहिला. तसेच बेयरस्टोने १४५ चेंडूंचा सामना करताना नाबाद ११४ धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रुट-बेयरस्टोची शतकी खेळी आली भारताच्या विजयाआड
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डची मोठी डील! पुढील पाच वर्षांमध्ये खेळाडूंना मिळणार ‘इतके’ कोटी
कॅप्टन बुमराहने रचला इतिहास, पाकिस्तानच्या दिग्गजाचा विक्रम मोडत सेना देशांत केली ‘ही’ कामगिरी