इंग्लंड विरुद्ध भारत महिला संघातील 3 सामन्यांची टी20 मालिका नुकतीच पार पडली आहे. या मालिकेतील तिसरा व निर्णायक टी20 सामना गुरुवारी (15 सप्टेंबर) ब्रिस्टल येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय खेळाडू इंग्लंडपुढे पूर्णपणे हतबल दिसल्या. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ निर्धारित 20 षटकात 8 बाद 122 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने 18.2 षटकात भारताचे आव्हान पूर्ण केले आणि 7 विकेट्सने सामना जिंकला.
हा सामना गमावत भारतीय संघाने 1-2 च्या फरकाने 3 सामन्यांची टी20 मालिकाही गमावली आहे. यासह भारतीय संघ पुन्हा एकदा 16 वर्षांपासूनचही पराभवाची मालिका मोडण्यात पुन्हा एकदा अयशस्वी ठरला आहे. भारत आणि इंग्लंड संघात आतापर्यंत 6 द्विपक्षीय टी20 मालिका खेळल्या गेल्या आहे. यापैकी फक्त एक मालिका जिंकण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला आहे. त्यांनी ऑगस्ट 2006 मध्ये शेवटची द्विपक्षीय टी20 मालिका जिंकली होती.
भारताच्या 123 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून सलामीवीर सोफी डंकलेने सर्वाधिक धावा केल्या. तिने 44 चेंडू खेळताना 6 चौकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. तसेच एलिस कॅपसेने 24 चेंडूत नाबाद 38 धावा फटकावल्या. डॅनियल वॅटनेही 22 धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे इंग्लंड संघाने 18.2 षटकातच 3 विकेट्सच्या नुकसानावर सहज भारताचे आव्हान पूर्ण केले.
या डावात भारताकडून राधा यादव, पूजा वस्त्राकार आणि स्नेह राणा यांना विकेट्स घेण्यात यश आले. त्यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
#TeamIndia fought hard but it was England who won the third T20I to win the series 2-1. #ENGvIND
Scorecard ▶️ https://t.co/kRDuI8uFlA pic.twitter.com/PqOXzzwH9s
— BCCI Women (@BCCIWomen) September 15, 2022
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी खूपच निराशा केली. भारताच्या आघाडीच्या 6 फलंदाज 52 धावांवरच बाद झाल्या होत्या. शेफाली वर्मा, स्म्रीती मंधाना, कर्णधार हरमनप्रीत कौरसहित भारताच्या 6 फलंदाज एकेरी धावेवर माघारी परतल्या. यष्टीरक्षक रिचा घोषने शेवटी चिवट झुंज दिली. तिने 22 चेंडूत 33 धावा केल्या. तसेच दिप्ती शर्माने 24 आणि पूजा वस्त्राकारने 19 धावा केल्या. मात्र या खेळींचा फायदा झाला नाही.
या डावात इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच साराह ग्लेनने 2 विकेट्स व ब्रायन स्मिथ, डेविस आणि वाँगने प्रत्येकी एक विकेट काढत संघाच्या विजयात योगदान दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दरवर्षी याच दिवशी रॉजर फेडरर का देतो बॉलबॉयला पिझ्झा पार्टी?
न्यूझीलंड क्रिकेटमध्ये भूकंप, टी20 विश्वचषकापूर्वी धाकड अष्टपैलूने नाकारला केंद्रीय करार
टीम इंडियाच जिंकणार वर्ल्डकप! दोन वेळच्या विश्वविजेत्याने दाखवला विश्वास