---Advertisement---

केवळ 25 चेंडूत शतक ठोकणारा बहाद्दर आरसीबीकडे; 6 चेंडूवर 6 षटकारांचा कारनामाही नावे

On: शनिवार, डिसेंबर 24, 2022 6:44 PM
Will-jack-the-hundred
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव पार पडला. एकूण 79 खेळाडू या लिलावात विकले गेले. अनेक खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागली. या लिलावासाठी 27 इंग्लिश खेळाडूंची अंतिम यादी तयार झालेली.  त्यातील 8 खेळाडूंवर अंतिम बोली लावण्यात आली. यापैकी एक नाव आक्रमक फलंदाज विल जॅक्स याचे देखील आहे. हा विल जॅक्स नक्की कोण आहे हे आपण जाणून घेऊया.

 

विल जॅक्स याला इंग्लंडचा भविष्यातील मोठा खेळाडू म्हणून मानले जाते. त्याने इंग्लंडसाठी आत्तापर्यंत केवळ दोन कसोटी व दोन टी20 सामने खेळले आहेत. मात्र, त्याला टी20 क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. केवळ 24 वर्षांच्या फलंदाजाने आपल्या कारकिर्दीत असे काही कारनामे केलेत आहेत, याबद्दल अनेकांना माहित नाही.

सन 2019 मध्ये दुबई येथे झालेल्या एका प्रि-सिजन टी10 सामन्यात त्याने सरे संघाकडून लॅंकेशायरविरुद्ध खेळताना केवळ 25 चेंडूत शतक पूर्ण केलेले. याच सामन्यात त्याने स्टीफन पेरी याच्या एका षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी केली. या सामन्याला अधिकृत सामन्याचा दर्जा मिळाला असता तर, हे क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठरले असते. तसेच, नुकत्याच झालेल्या पाकिस्तान दौऱ्यावेळी रावळपिंडी कसोटीत 6 बळी मिळवले होते. तसेच तो एक शानदार क्षेत्ररक्षक देखील आहे.

त्याच्या याच एकूण खुबीमुळे त्याच्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने विश्वास दाखवला. राजस्थान रॉयल्स यानेदेखील त्याच्यासाठी प्रयत्न केला. मात्र, 3 कोटी 20 लाख रुपयांची रक्कम देत आरसीबीने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.

(England Young Explosive Batter Will Jacks Sold In IPL 2023 Auction)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या सीएसकेने केला अपमान; आता भिडूने लिलावात साडेचार कोटी घेत रचला इतिहास
बीसीसीआयला वाटतेय भीती! आयपीएल संघांनी उचललेल्या ‘या’ पावलामुळे बोर्डाला फुटलाय घाम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---