---Advertisement---

3-0 ने हरलो तरी हरकत नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला हरवू इंग्लंडच्या बेन डकेटच मोठं वक्तव्य

On: शनिवार, फेब्रुवारी 15, 2025 9:47 PM
---Advertisement---

इंग्लंड संघाचा सलामीवीर फलंदाज बेन डकेटने (Ben Duckett) भारतीय संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेदरम्यान एक मोठं वक्तव्य केलं होतं. भारत-इंग्लंड वनडे मालिकेतील शेवटचा सामना (12 फेब्रुवारी) रोजी खेळला गेला. पण डकेटने केलेलं विधान अजूनही चर्चेचा विषय बनले आहे. डकेट म्हणाला होता की, भारताविरुद्ध 3-0 ने हरलेल्या मालिकेचा आम्हाला काही फरक पडत नाही. कारण आम्ही त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पराभूत करणार आहोत.

भारत-इंग्लंड संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना (9 फेब्रुवारी) रोजी खेळला गेला होता. हा सामना भारतीय संघाने 4 विकेट्सने जिंकून मालिकेमध्ये 2-0 ने आघाडी घेतली होती. या सामन्यानंतर डकेट म्हणाला की, इंग्लंड संघ वनडे मालिकेत भारताविरुद्ध जरी 3-0 ने हरला तरी त्यांच्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही कारण ते भारतीय संघाला चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरवणार आहेत. डकेटच्या या वक्तव्यानंतर मोठ्या दिग्गजांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय संघाचा माजी फलंदाज आकाश चोप्रा आणि माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने डकेटच्या विधानानंतर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. डकेटनेही त्याच्या वक्तव्यानंतर स्पष्टीकरण दिले आहे तो म्हणाला, इंग्लंड संघाला चांगल्या खेळाची गरज आहे आणि भारतीय संघासोबत खेळणं सगळ्यात मोठ्या मालिकापैकी एक आहे. तत्पूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि बरोबर वेळेत टॉपवर जाणं आमचं लक्ष्य आहे .बेन डकेटने एक्सवरच्या पोस्टला प्रत्युत्तर देताना हे स्पष्टीकरण दिले होते.

भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि सध्या प्रभावी समालोचक असलेला आकाश चोप्राने डकेटच्या विधानानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “भारत-इंग्लंड वनडे मालिका डकेटच्या विधानाशिवाय अपूर्ण आहे.”

आर अश्विन म्हणाला, “आम्हाला फरक पडत नाही डकेट काय म्हणतो. पण या मालिकेतील पराभवाचा त्याच्या आत्मविश्वासावर मोठा प्रभाव पडेल. आता हे पाहणं उत्सुकतेच असेल की डकेटच्या वक्तव्यानुसार इंग्लिश संघ चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कशी कामगिरी करेल.”

हेही वाचा 

बाबर आझमच्या इंग्रजीवर ताशेरे, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाने केली गमतीदार टिपणी!

पाकिस्तानची घसरण, टीम इंडियाने आयसीसी क्रमवारीत दाखवला दबदबा!

खराब फॉर्ममुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘हे’ 5 स्टार खेळाडू आपल्या संघासाठी ठरणार घातक?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---