इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळली जाणार ऐतिहासिक ऍशेस मालिका यावर्षी 16 जूनपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी इंग्लंड संघाची घोषणा केली गेली आहे. हा संघात एकूण 16 सदस्यांचा असून यात एका युवा खेळाडूलाही संधी दिली गेली आहे. आयर्लंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या जोश टंग याला या संघात निवडले गेले आहे. सोबतच त्यांचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन देखील दुखापतीतून सावरल्यानंतर ऍशेससाठी सज्ज आहे.
जेम्स अँडरसन (James Anderson) इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाज राहिला आहे. मात्र, मागच्या काही दिवसांपासून अँडरसन दुखापतीचा सामना करत होता. दुखापतीमुळे तो ऍशस 2023 खेळणार की नाही, अशी शंका काहीजणांना होती. चाहत्यांची ही शंका शनिवारी (3 जून) मिटली. कारण ऍशेसच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी निवडलेल्या इंग्लंड संघात त्याची निवड केली गेली आहे. सोबतच जोश टंग (Josh Tongue) देखील इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमाणाची ताकद वाढवणार आहे. जोश टंगने आयर्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंडकडून पदार्पण केले. या सामन्यातील पहिल्या डावात त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण दुसऱ्या डावात त्यानेच इंग्लंडसाठी सर्वोत्तम प्रदर्शन केले. जोशने सामन्यातील दुसऱ्या डावात टाकलेल्या पहिल्या 15 षटकांमध्येच 4 विकेट्स घेतल्या आहेत.
पहिल्या दोन ऍशेस सामन्यांसाठी इंग्लंड संघ –
बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेयरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रुक, जॅक क्रॉली, बेन डकलेट, डॅन लॉरेंस, जॅक लीच, ओली पॉप, मॅथ्यू पॉट्स, ओली रॉबिन्सन, जो रूट, जोस टंग, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
(England’s squad for the first two Tests of Ashes 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मैदान गाजवलं! ओली पोपचे वेगवान द्विशतक, मायदेशातील 41 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला
अजिंक्य रहाणेला कठीण काळात मिळाली ‘या’ लोकांची साथ, भारतीय संघातील पुनरागमनामुळे दिग्गज इमोशनल