---Advertisement---

IND vs ENG: भारताविरुद्ध चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर! ‘हा’ स्टार खेळाडू संघात दाखल

On: मंगळवार, जुलै 15, 2025 4:01 PM
---Advertisement---

England squad announced for fourth Test: सध्या भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील 3 सामने खेळले गेले आहेत. दरम्यान इंग्लंडचा संघ मालिकेत 2-1 अशा आघाडीवर आहे. नुकताच लाॅर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत-इंग्लंड संघात तिसरा सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने 22 धावांनी शानदार विजय मिळवला. आता दोन्ही संघातील चौथा कसोटी सामना एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरच्या मैदानावर खेळला जाईल. त्यासाठी इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. (England squad announced for fourth Test)

भारताविरुद्ध चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ- बेन स्टोक्स (कर्णधार), जो रूट, जोफ्रा आर्चर, गस ॲटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, लियाम डॉसन, बेन डकेट, ओली पोप, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 35 वर्षीय फिरकीपटू लियाम डॉसन याची युवा फिरकीपटू शोएब बशीरच्या जागी इंग्लंडच्या कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. (Liam Dawson in for Shoaib Bashir)
































Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---