मुंबई । इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार जो रूट हा दुसऱ्यांदा पिता झाला आहे. त्याची पत्नी कॅरी कॉट्रोलने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रूटने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या छोट्याशा परीचा फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.
रूटला वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळायचा होता. मात्र त्याने या दरम्यान आपल्या पत्नीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याच्या जागी बेन स्टोक्स याला पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाचा कर्णधार बनवण्यात आले.
हे फोटो शेयर करत लिहले की, “इंग्लंडचा संघ आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी आपल्याला ‘सपोर्ट’ करत आहेत.” जो रूटने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याचे दोन्ही मुलं दिसत आहेत. इंग्लंड क्रिकेटने देखील दुसऱ्यांदा पिता झाल्यानंतर जो रूटला ट्विटच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.
https://www.instagram.com/p/CCYLvVzpCEl/?utm_source=ig_web_copy_link
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना 16 जुलैपासून मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात जो रुट उपलब्ध असेल. तत्पूर्वी तो सात दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात जो रुटच्या जागी बेन स्टोक्स संघाचे नेतृत्व सांभाळत आहे. बेन स्टोक्स या कसोटी सामन्यात स्वतःला सिद्ध करेल असा विश्वास जो रूटने व्यक्त केला आहे. यावर बेन स्टोक्स म्हणाला की, “कसोटी संघाचा कर्णधार म्हणून ब्लेझर घालून मी फोटोशूट केल्यानंतर मला रुटचा एक एसएमएस आला. ज्यामध्ये लिहिले होते की, तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळा.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-अतिशय देखण्या बायका असलेले ५ फ्लॉप भारतीय क्रिकेटर्स
-विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तान का खातो सपाटून मार? जाणून घ्या कारणं
-क्रिकेट विश्वातील ५ अतिशय सुंदर व हॉट महिला समालोचाक, पहा फोटो