---Advertisement---

CWC 2023 । कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा 33 धावांनी विजय, गतविजेत्यांचे आव्हान संपुष्टात

On: शनिवार, नोव्हेंबर 4, 2023 10:28 PM
AUS vs ENG
---Advertisement---

शनिवारी (4 नोव्हेंबर) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमांचक सामना पाहायला मिळाला. विश्वचषक 2023 मधील हा 36 वा सामना असून ऑस्ट्रेलियाने 33 धावांनी विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंडचा सात पैकी सहावा विजय आहे. शनिवारी मिळालेल्या पराभवानंतर इंग्लंड संघ अधिकृतपणे उपांत्य फेरीच्या स्पर्धेतून बाहेर पडला.

इंग्लंडला या सामन्यात विजयासाठी 287 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण 48.1 षटकांमध्ये इंग्लंड संघ सर्वबाद झाला आणि विश्वचषकातून संघ बाहेर पडला. सलामीवीर डेव्हिड विली (50) आणि जो रुट (64) यांनी यैयक्तिक अर्धशतके केली. मोईन अली याने 43 चेंडूत 42 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियासाठी ऍडम झॅम्पा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यातील पहिल्या डावात 286 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन फलंदाज इंग्लिश गोलंदाजांच्या तुलनेत या सामन्यात दुबळे दिसले. आपल्या वाट्याची 50 षटकेही त्यांना खेळून करता काढता आली नाही. 49.3 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्व फलंदाज सर्वबाद झाले. यात मार्नस लॅबुशेन याने सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. कॅमरून ग्रीन याने 47, तर स्टीव स्मिथ 44 धावांची खेळी केली. इंग्लंडसाठी ख्रिस वोक्स याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मार्क वुड आणि आदिल राशिद यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. डेव्हिड विली आणि लियाम लिविंगस्टोन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या. (England’s World Cup challenge ends after defeat against Australia)

महत्वाच्या बातम्या – 
डीएलएस नियमाचा पाकिस्तानला फायदा, 21 धावांनी दिली न्यूझीलंडला मात, गुणतालिकेत फेरबदल 
VIDEO । ग्रीनने थेट पंचांनाच मारली होती बॅट! सुदैवाने दुखापत होता होता राहिली 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---