इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तुल्यबळ संघ वनडे विश्वचषक 2023च्या 36व्या सामन्यात आमने सामने आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना आयोजित केला गेला आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 286 धावा केली. कॅमरून ग्रीन या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी दुसरी सर्वोत्तम खेळी करणारा फलंदाज ठरला. यादरम्यान ग्रीनकडे लाईव्ह सामन्यात पंचांना गंभीर दुखापत होता होता राहिली.
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 49.3 षटकांमध्ये 286 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) याने सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. कॅमरून ग्रीन संघासाठी दुसरी सर्वोत्तम खेळी करणारा फलंदाज ठरली. ग्रीनने 52 चेंडूत 47 धावा केल्या. डावातील 41 व्या षटकात डेविड विली याने त्याला बाद केले. तत्पूर्वी डावातील 31 व्या षटकात मार्क वुडने टाकलेल्या एका शॉर्ट चेंडू ग्रीनने खेळून काढण्याचा प्रयत्न केला. पण यादरम्यान बॅट त्याच्या हातातून निसटली लेग अंपायरच्या दिशेने हवेत उडाली. सुदैवाने हवेत उडालेली बॅट पंचांना जाऊन लागली नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
— Cricket Videos Here (@CricketVideos98) November 4, 2023
(The bat slips from Cameron Green and the umpire narrowly escapes)
प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेअरस्टो, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, बेन स्टोक्स, डेविड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स.
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिंस (कर्णधार), स्टीव स्मिथ, जोश इंग्लिस, मार्नस लॅब्युशेन, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, एडम झॅम्पा, मिचेल स्टार्क.
महत्वाच्या बातम्या –
18 वर्षाखालील सुपर सिरीज टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, समीहन देशमुख, स्वर्णिम येवलेकर यांची आगेकूच
७ नोव्हेंबर पासून रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा, महिंद्रा थार, ट्रॅक्टर सह विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट